चेन्नई कसोटीबाबत प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई ः जोरदार चक्रीवादळामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील चेन्नई कसोटी रद्द होण्याचीच दाट शक्‍यता असल्याचे सांगितले जात आहे. ही कसोटी 18 डिसेंबरपासून होणार आहे.

मुंबई ः जोरदार चक्रीवादळामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील चेन्नई कसोटी रद्द होण्याचीच दाट शक्‍यता असल्याचे सांगितले जात आहे. ही कसोटी 18 डिसेंबरपासून होणार आहे.

आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्‍ला यांनी ही कसोटी चेन्नईतच होईल, असे सांगितले असले तरी, तमिळनाडू क्रिकेट पदाधिकाऱ्यांना याबाबत शंकाच आहे. शहरातील यंत्रणा कोलमडली आहे. दोन दिवसांनी त्यात सुधारणा होईल. त्यानंतर स्काईपद्वारे चर्चा करून निर्णय होईल, असे सांगितले. भारतीय क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चेन्नईतील परिस्थिती पाहता तिथे कसोटी होण्याची शक्‍यता धूसर आहे. त्याचबरोबर एवढ्या कमी कालावधीत अन्य ठिकाणी कसोटीही होणार नाही. त्यामुळे ही कसोटी रद्द होण्याचीच शक्‍यता आहे, असे सांगितले.

. . . . .

Web Title: question on chennai test