Watch Video : पाकिस्तानची ODI सामन्यात ३० यार्ड सर्कलशी छेडछाड? व्हिडीओ पाहून व्यक्त होतंय आश्चर्य

umpire with pakistani players changed the 30 yard circle new zealand vs pakistan odi series
umpire with pakistani players changed the 30 yard circle new zealand vs pakistan odi series

शनिवारी २९ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात पाच सामन्यांची वनडे इंटरनॅशनल सीरीजचा दुसरा सामना खेळण्यात आला. या हाय स्कोरींग सामन्यात पाकिस्तानी संघाला विजय मिळाला. पण या सामन्यादरम्यान एखा विचित्र प्रकार झाल्याचं पाहायला मिळालं. असा प्रकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानी संघाने या सामन्यात ३० यार्डच्या वर्तुळासोबत छेडछाड केल्याचे बोलले जात आहे.

रावळपिंडीत वनडे सीरीजचा दुसरा सामना खेळण्यात येत होता. यादरम्यान न्यूझीलँडचा संघ फलंदाजी करत होता. पहिली ओव्हर संपली आणि दुसरी ओव्हर सुरू होणार तेव्हा लक्षात आलं की मैदानातील ३० यार्ड सर्कल व्यवस्थित दिसत नव्हतं. काहीतरी गडबड असल्याची अंपायर्सना चाहूल लागताच त्यांनी हे दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाचे खेळाडू देखील यामध्ये सामील झाल्याचे पाहायला मिळाले. ओव्हर बदलल्यानंतर लेग अंपायर तेथे पोहले तेव्हा हे सगळा प्रकार उघड झाला.

umpire with pakistani players changed the 30 yard circle new zealand vs pakistan odi series
IPL 2023 Points Table : गुजरातचा पराक्रम, तर दिल्लीच्या पराभवाचा मुंबईला धक्का; जाणून घ्या स्थिती
umpire with pakistani players changed the 30 yard circle new zealand vs pakistan odi series
Yuzvendra Chahal : रोहितच्या बर्थ डे पार्टीत युजवेंद्र चहल टल्ली? अडखळत चालतानाचा 'तो' Video Viral

यानंतर सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की ३० यार्ड सर्कलमध्ये जवळपास ७ ते ८ मीटरचा फरक होता. याचा थेट परिणाम सामन्यावर होणार होता. मात्र अद्याप यावर पाकिस्तानी क्रिकेट बोर्टाने स्पष्टीकरण दिले नाहीये. नेमकी ही कोणाची चूक आहे याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.

या मैदानावर ३० यार्ड सर्कलसाठी जेथे मार्क असतात तेथे व्हाइट कार्ड टाकण्यात आले नव्हते. ते वेगळ्याच लाइनमध्ये टाकण्यात आले होते. जे ३० यार्डच्या खूप बाहेर होते. आता प्रश्न उपस्थित केला जातो आहे की हा खोडसाळपाणा होता की आणखी काही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com