भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर रवाना

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

कसोटी संघ पुढीलप्रमाणे - विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी.

मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडीजच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी रात्री वेस्टइंडीजला रवाना झाला. भारतीय संघ प्रथमच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.

भारतीय संघ या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 21 ते 25 जुलैदरम्यान अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्डस मैदानावर खेळविला जाणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी जमैकामध्ये (30 जुलै ते 3 ऑगस्ट), तिसरी कसोटी सेंट ल्युसियामध्ये (9 ते 13 ऑगस्ट) आणि चौथी कसोटी पोर्ट ऑफ स्पेन येथे (18 ते 22 ऑगस्ट) खेळविली जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षीय संघाविरुद्ध दोन तीन दिवसीय सराव सामने खेळणार आहे.

भारतीय संघाने यापूर्वी 2011 मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. ही मालिका भारताने 1-0 अशी जिंकली होती. दोन सामने अनिर्णित राहिले होते.

Web Title: Virat Kohli's Team India Leave for West Indies