भारताकडून वेिंडीजला 'व्हाईटवॉश' ; 2-0 मालिका जिंकली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 October 2018

हैदराबाद : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. दुसऱ्या कसोटीत भारताने विंडीजचा दहा गडी राखून पराभव केला.

हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज (रविवार) तिसऱ्या दिवशी भारताने 367 धावा करत विंडीजविरुद्ध 56 धावांची आघाडी घेतली. या आघाडीनंतर बॅकफूटवर गेलेल्या विंडीजच्या संघाला दुसऱ्या डावात अवघ्या 127 धावांत भारतीय गोलंदाजांनी गुंडाळले. पहिल्या डावातील भारताचा यशस्वी गोलंदाज उमेश यादवने दुसऱ्या डावातही कमाल केली. उमेशने 4 बळी मिळविले. तर, रवींद्र जडेजाने तीन, अश्विनने दोन आणि कुलदीपने एक बळी मिळविला. विंडीजचा पहिल्या डावातील शतकरीवर चेस दुसऱ्या डावात अवघ्या सहा धावा करू शकला. विंडीजकडून अॅम्ब्रेसने सर्वाधिक 38 धावा केला.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने दुसऱ्या दिवशीच पकड घट्ट बसवण्यास सुरवात केली होती. विंडीजचे 72 धावांचे आव्हान भारतीय सलामीवीरांनी सहजरित्या पार करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या कसोटीत डावाने विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला विंडीजने दुसऱ्या कसोटीत थोडाफार प्रतिकार केला. विंडीजचा नवखा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whitewash to Windies from India 2-0 series win