Pune Crime: सायबर चोरट्यांकडून म्हाडाच्या अधिकाऱ्याला ३५ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime News

Pune Crime: सायबर चोरट्यांकडून म्हाडाच्या अधिकाऱ्याला ३५ लाखांचा गंडा

लाईफ इन्शुरन्सच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी म्हाडा मध्ये काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याला फसवल्याची घटना पुण्यात घडली आहे. दिल्ली, नोएडा मधील विविध १२ बँक अकाऊंट मध्ये त्यांचे पैसे जमा झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्येष्ठ नागरिकाला दीड वर्षांपूर्वी लाईफ इन्शुरन्स घ्या, त्यावर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यासाठी फक्त अगोदर हप्ता भरावा लागेल, असे सांगत सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले. चोरट्यांवर विश्वास बसल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने नेट बँकिंगच्या स्वरूपात दिल्ली, नोएडा मधील असणाऱ्या विविध बँकांमध्ये तब्बल ३५ लाख रुपये भरले.

हेही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कुठली ही रक्कम पुन्हा पाठवू नका, असे सांगितले असताना देखील ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांना २ महिन्यापूर्वी आणखी ५ लाख रुपये पाठवले. त्यानंतर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: महिलेला पोलिस चौकीत जबर मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

हा सगळा प्रकार दीड वर्षांपासून घडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमके हे चोर कोण आहेत ? यांची नावं काय आहेत? आणि यात कुठली गॅंग सक्रीय आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन आणि इतर कोणतेही व्यवहार करताना सत्यता पडताळणी करुनच आर्थिक व्यवहार करावा असा सल्ला पोलिसांनी दिलाय.