
Astro Tips : रागावर नियंत्रण करून प्रगतीचे दार उघडतो हा रत्न
Astro Tips For Anger Control And Properity : ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतल्या ग्रहांच्या दशेनुसार योग्य तोच रत्न घातला पाहिजे. त्याविषयी आवश्यक ती काळजा घेणं गरजेचं असते. असाच एक रत्न आहे. जो धारण केल्यावर रागावर नियंत्रण मिळवता येतं. प्रगती आणि भरभराट होते. हा रत्न मोतीचा उपरत्न समजला जातो. चंद्र ग्रहाशी निगडीत या रत्नाचं नाव आहे मूनस्टोन (चंद्रकांत मणी). जाणून घेऊया.
या रत्नाच्या चमकमुळे तो नीळा किंवा दुधाळ रंगाचा असतो. बघताना चांदीसारखा दिसतो. हा उपरत्न पॉझिटीव्हीटी, नवी उर्जा आणि मनाच्या शांतीचं प्रतिक समजला जातो. आयुष्याचा स्तर उंचावण्याबरोबरच जीवनात शांती आणि संतुलन आणण्याचा काम करतो.
हा मोती सारखाच मुल्यवान उपरत्न आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी सगळ्यात उपयुक्त आहे. या लोकांना गुणवत्ता वाढवण्यासाठी या रत्नाचा फार फायदा होतो.
याचे फायदे
हा उपरत्न पॉझिटीव्हीटी आणि मनाची शांती वाढवतो.
आक्रमकता कमी करण्यास मदत करतो.
आवेगपूर्ण, असंवेदनशील लोकांना शांती आणि स्थिरता आणण्यास मदत करतो.
पचनासंबंधित समस्या सोडवण्यास मदत करतो.
अनिश्चित पाळी आणि जाडी कमी करण्यास मदत करतो.
यामुळे नीडर आणि साहसी होण्यास मदत होते.
व्यवसायात प्रगती आणि नोकरीच्या उत्तोमोत्तम संधी मिळवून देण्यास मदत करते.
कशी घालावी ही अंगठी
ज्या हाताने लिहीतात त्या हाताच्या करंगळीत ही अंगठी घालावी.
घालण्याआधी अंगठीवर गंगाजल आणि कच्च्या दूधाने अभिषेक करून पूर्ण श्रद्धेने अंगठी घालावी.