Rang Panchami : रंगपंचमीला करा 'हे' उपाय घरात कायम राहील लक्ष्मीचा वास l Astro Tips For Rang Panchami 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranga Panchami

Rang Panchami : रंगपंचमीला करा 'हे' उपाय घरात कायम राहील लक्ष्मीचा वास

Astro Tips For Rang Panchami 2023 : होळीचा सण सर्व देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. होळी नंतरची पंचमी ही रंगपंचमी म्हणून साजरी करण्यात येते. रंगपंचमीला देव पंचमीपण म्हणतात. असे सांगितले जाते की, या दिवशी काही खास उपाय केले तर लक्ष्मीची कृपा बरसते.

उत्तरेकडे होळीच्या दिवसापासून सुरू झालेल्या या रंगांच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजे रंगपंचमी असतो. तर महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या काही भागात रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळले जातात. अशी मान्यता आहे की, या दिवशी देवतागण सुद्धा होळी खेळण्यासाठी पृथ्वीवर येतात.

या दिवशी अबीर गुलाल, हळद, चंदन याच्यासोबत फुलांनी बनलेल्या रंगांनी खेळलं जातं. असं मानलं जातं की, यामुळे सगळे देवी देवता प्रसन्न होऊन माणसाला सुख-समृद्धी प्रदान करतात.

शास्त्रांनुसार या दिवशी दैवी शक्तींचा प्रभाव जास्त असतो. म्हणूनच आकाशात वेगवेगळे रंग उडवले जातात. यामुळे नकारात्मक शक्तीला हरवले जाते. आणि जीवनात सकारात्मकता वाढते.

रंगपंचमीला करायचे उपाय

  • लक्ष्मीला गुलाल अर्पण करून कनकधारा स्तोत्राचे वाचन करावे. यामुळे लक्ष्मीचा कायम आपल्या घरात वास राहतो आणि कधीही धनाची कमतरता भासत नाही.

  • राधा-कृष्णाला पिवळा रंग अर्पण करा. वैवाहिक आयुष्यात ताण तणाव संपतील, तर जे जोडिदाराचा शोध घेत आहेत त्यांना मनासारखा जोडिदार मिळेल.

  • विवाहित महिलांनी रंग पंचमीला पार्वती मातेला सौभाग्याचा सर्व श्रृंगार अर्पण करायला हवा. असं केल्याने पतीवर येणारे सर्व संकट दूर होतात. सौभाग्य लाभते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :HoliPositivity