Kali Yuga End : कलियुगाचा खरंच शेवट जवळ आलाय? ज्योतिषांनी सांगितलं कलियुग कधी संपणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kali Yuga End

Kali Yuga End : कलियुगाचा खरंच शेवट जवळ आलाय? ज्योतिषांनी सांगितलं कलियुग कधी संपणार...

Kali Yuga End : भारतात धर्म आणि संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत चार युग,चार वेद,अठरा पुराणेला विशेष स्थान आहे. यात युगांमध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी चार युगे मानली गेली आहेत.

पण सध्या वाढते आजार, अपराध, जीवित हानी, निसर्ग नाश यामुळे कलियुग संपायच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कोणी कोणी तर कलियुगचा शेवट जवळ आलाय, असंही म्हणतात. खरंच कलियुग लवकरच संपणार का? आणि कधी संपणार, आज आपण ज्योतिषींकडून जाणून घेऊया.

सध्या कलियुग सुरू आहे. श्री सूर्यसिद्धांतमताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्म देवाचे आयुष्य शंभर वर्ष आहे. त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली आहेत.

सांप्रत एक्कावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या घटिका १३, पळे ४२, आणि तीन अक्षरे होऊन गेली. चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो अन् तेव्हढ्याच लांबीची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ मनु होतात.

त्यांची नावे खालील प्रमाणे -

१) स्वायंभुव

२) स्वारोचिष

३) उत्तम

४) तामस

५) रैवत

हेही वाचा: Urfi Javed Astrology : यंदाची संक्रात उर्फीसाठी क्लेशदायक, कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार, ज्योतिषी म्हणतात...

६) चाक्षुष

७) वैवस्वत

८) सावर्णि

९) दक्षसावर्णि

१०) ब्रह्मसावर्णि

११) धर्मसावर्णि

१२) रुद्रसावर्णि

१३) देवसावर्णि

१४) इंद्रसावर्णि ही आहेत.

डॉ  नरेंद्र  धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

त्या प्रत्येक एका मनुत ७१ महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे ४३ लाख २० हजार आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत वर्ष होऊन गेले.

सध्या सुरु असलेले वैवस्वत मन्वंतर सातवे आहे. वैवस्वत मन्वंतरातील २७ महायुगे जाऊन २८ वे महायुग सुरु आहे. यात कृतयुगाची वर्षे १७ लाख २८ हजार, त्रेता युगाची वर्षे १२ लाख ९६ हजार, द्वापार युगाची वर्षे ८ लाख ६४ हजार, कलियुगाची वर्षे ४ लाख ३२ हजार इतकी आहेत.

हेही वाचा: Urfi Javed Astrology : यंदाची संक्रात उर्फीसाठी क्लेशदायक, कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार, ज्योतिषी म्हणतात...

सध्या कलियुग सुरु आहे. कलियुगामध्ये ६ शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठीर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक १८ हजार वर्षे.

चौथा वैतरिणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लाक वर्षे असेल. सहावा कोल्हापुर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगाच्या एकंदर कालखंडातून ५१२३ वर्षे मागे पडली आहेत अन् ४ लाख ८७७ वर्षे कलियुगाची शिल्लक आहेत. म्हणून कलियुग संपायला ४ लाख ८७७ वर्षे बाकी आहे.

- डॉ नरेंद्र धारणे,

धर्मशास्त्र अभ्यासक

टॅग्स :AstrologyAstrologist