Bhagwat Ekadashi : भागवत एकादशीला महिलांनी या मंत्राचा जप करावा, सुख-समृद्धीने होईल भरभराट l Bhagwat Ekadashi 2023 Mantra Jap benefits wealth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Ekadashi

Bhagwat Ekadashi : भागवत एकादशीला महिलांनी या मंत्राचा जप करावा, सुख-समृद्धीने होईल भरभराट

Bhagwat Ekadashi Mantra Jap : वारकरी संप्रदायात हे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिद्धी आहे. या दिवशी विष्णू भक्त आणि विठ्ठल भक्त उपवास करतात. जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादसीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते, असे म्हटले जाते. त्या व्यक्तीची उत्तोरोत्तर प्रगती होते. या दिवशी विशेष करून महिलांनी व्रत, उपवास करावे.

वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत स्मार्त व भागवत असे दोन संप्रदाय आहेत.

वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे. रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे.

ही एकादशी मोठ्या एकादशींपैकी एक आहे. त्यामुळे याचे विशेष महत्व आहे. या दिवशी उपवास केला असाता सर्व मनोकामना पूर्ण होतात. महिलांनी उपवास केल्याने त्यांच्या इच्छा पुर्ण होतात. विवाहित महिलांच्या संसारात अचानक सुख, समृद्धी येते. म्हणून या दिवशी 'ओम नमो नारायणाय' या मंत्राचा शक्य तितका जास्त जप करावा. हा जप कमीतकमी २१ वेळा व जास्तीत जास्त कितीही वेळा करू शकतात. त्यामुळे जीवनातूल अडचणी, विघ्न दूर होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Ekadashi