celebration of Maha shivaratri
celebration of Maha shivaratri sakal

महाशिवरात्रीचा उत्सव भक्तीमय वातावरणात

झेंडा चौकात साबुदाणा उसळ वाटप

मानोरा : जय भोले कावड़ मंडळ वसंतनगर मानोरा यांच्यावतीने आज दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त साबूदाणा उसळीचे वाटप करण्यात आले. उसळ वाटप सकाळी ११ वाजतापासून ४ वाजेपर्यंत करण्यात आले. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी कावड मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे शहर प्रमुख राजू देशमुख, अमर ढगे, सागर भाकरे,गोपाल पिंपळकर, अंकुश बेंद्रे, गजानन गाढवे, तेजस बेंद्रे, रवि गवई, सर्वेश बेंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याकरिता योगदान दिले. पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली.

उंबर्डा बाजार : येथील बजरंग चौकाजवळील महादेव मंदिरासह विविध ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. भक्तांनी मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले व आराधना केली.

उंबर्डा बाजार येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र राफेरी येथील भगवान महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पुरातन शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हर हर महादेवाच्या जय घोषाने परिसर दणाणला होता. शिवलिंगाला प्रभातसमयी दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात सोमठाणा येथील युवक मंडळीच्या वतीने फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. महादेव मंदिरासह परिसरातही आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मालेगाव : महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी तालुक्यातील विविध शिवमंदिरात श्री शंकराचे दर्शन घेतले. बऱ्याच ठिकाणी उसळीचे वाटप करण्यात आले.

महाशिवरात्रीची कथा जिथे घडली त्या श्री चंदरेश्वर संस्थान चांडस येथे, प्रभू श्रीरामचंद्र यांनी वास्तव्य केलेल्या श्री तापेश्वर संस्थान, तपोवन, श्री जानगिर महाराज संस्थान शिरपूर, श्री नाथ नंगे महाराज संस्थान डव्हा, मालेगाव शहरातील श्री मालनेश्वर संस्थान, श्री ढवलेश्वर संस्थान, श्री योगेश्वर संस्थान, श्री कोथळेश्वर संस्थान, मालेगाव केळी जोड रस्त्यावरील श्री विठ्ठल रुख्मिनी शिव मंदिर, श्री चंदनशेष संस्थान, श्री ओलांडेश्वर संस्थान, श्री सिध्देश्वर संस्थान सुदी आदी मंदिरात भाविकांनी श्री शंकराचे दर्शन घेतले

सूर्योदयाच्या वेळी शिव मंदिरात श्री शंकराला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. सकाळी, दुपारी व सायंकाळी आरती करण्यात आली. अनेक मंदिरात भक्तांना उसळीचे वाटप करण्यात आले

रिसोड : शहरातील सिव्हिल लाईन स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयात संचालिका ब्रह्माकुमारी ज्योतीदिदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त १ मार्चच्या सकाळी ब्रह्माकुमारीज विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्माकुमारीज सर्व मनुष्य आत्म्यांना ईश्वरीय संदेश देण्याचे ईश्वरीय कार्य करीत असल्याचे यावेळी दिदींनी सांगितले. यावेळी दिदींनी सर्व उपस्थितांना शिव प्रतिज्ञा दिली. यावेळी विद्यालयाचे बहुसंख्य ज्ञानार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com