Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री सुरू होण्याआधीच उरकून घ्या ही कामं, नाहीतर...l chaitra navratri 2023 do these upay before starting navratri will get dhanlabh money shower | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaitra Navratri 2023

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री सुरू होण्याआधीच उरकून घ्या ही कामं, नाहीतर...

Chaitra Navratri 2023 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या 9 दिवसात भक्त माता राणीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे भक्ती उपाय करत असतात. नवरात्र सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत, त्याआधी तुम्ही घराची साफसफाई करावी आणि या काळात या वस्तू घराबाहेर काढण्यास विसरू नका, अशी मान्यता आहे की वस्तू घराबाहेर काढल्याने सकारात्मकता येईल. घर आणि सुख-समृद्धीचे निवासस्थान राहते, चला तर मग जाणून घेऊया उपायांबाबत सविस्तर.

पूजेच्या घराची साफसफाई करताना तुटलेल्या मूर्ती दिसल्यास ताबडतोब घराबाहेर काढा किंवा पाण्यात विसर्जित करा.असे मानले जाते की तुटलेल्या मूर्तीमुळे आपल्या नशिबी दुर्दैव येते. नवरात्रीच्या स्वच्छतेत घरातील जुने जोडे-चप्पल, फाटलेले कपडे काढा किंवा एखाद्या गरीबाला दान करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

हिंदू धर्मात कांदे आणि लसूण यांची गणना तामसिक आहारात केली जाते. नवरात्रीत कांदा-लसूण खाल्ल्याने माता राणीचा कोप होतो, असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये तामसिक भोजन निषिद्ध मानले जाते. (Astrology)

नवरात्रीच्या स्वच्छतेत घरातील बंद घड्याळ ताबडतोब बाहेर काढावे. थांबलेले घड्याळ चांगले मानले जात नाही. हे तुमचे दुर्दैव दर्शवते, त्यामुळे बंद घड्याळ घरात ठेवायला विसरू नका.

या उपायांनी घरात लक्ष्मी मातेचा वास राहील सोबतच धनाचा वर्षावही तुमच्यावर होईल. तेव्हा चैत्र नवरात्री येण्याआधीच हे उपाय आवर्जून करा. (Navratri)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.