Chaitra Navratri 2023 : आज दुर्गाष्टमी, या दिवशी चुकूनही करू नका या चुका, नाहीतर...

या दिवशी चुकूनही या चुका करू नका नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील
Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023 esakal

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीचा आज आठवा दिवस म्हणजेच दुर्गाष्टमी. नवरात्रीला अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस फार महत्वाचे मानले जातात. या दिवशी नवदुर्गेची पूजा अर्चना केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मात्र या दिवशी चुकूनही या चुका करू नका नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.

दुर्गाष्टमी पूजा पद्धत

मासिक दुर्गाष्टमी व्रत आणि उपासनेच्या या विधीचे धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे.

सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजास्थानाची गंगाजलाने शुद्धी करावी.

मंत्रोच्चार करताना लाल कापड पसरून त्यावर लाकडी आसनावर माता दुर्गादेवीची मूर्ती ठेवावी.

पूजेदरम्यान मात दुर्गेला गंगाजलाने अभिषेक करा.

घरातील मंदिरात देवीसमोर दिवा लावावा, अक्षता, कुंकू, लाल फुले अर्पण करावीत.

देवीला फळ मिठाई अर्पण करावी, धूप दीप लावून दुर्गा स्तोत्राचं पठण करावं.

यानंतर माता दुर्गेची आरती करावी, पूजा करताना झालेल्या चुकीबद्दल देवीची माफी मागावी.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri : कन्या पूजनला 'हे' दान करा, बरसेल लक्ष्मीकृपा

दुर्गाष्टमीला चुकूनही करू नका या चुका

तज्ज्ञांच्या मते, दुर्गाष्टमी पूजेदरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

माता दुर्गेच्या पूजेमध्ये प्रथम तुळस, आवळा, दुर्वा, मदार, ओक या गोष्टींचा वापर करू नये.

पूजेत माता दुर्गेची एकच प्रतीमा ठेवावी.

काय आहे दुर्गाष्टमीचे महत्त्व (Navratri)

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023 : अष्टमी अन् नवमी वेगवेगळ्या दिवशी का साजरी केली जाते? वाचा धार्मिक कारण

दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची पूजा केल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. जगदंबेच्या आशीर्वादाने भक्ताच्या घरात समृद्धी येते आणि अडथळे नष्ट होतात. माता प्रसन्न झाल्यावर दीर्घायुष्य मिळते, दुर्गाष्टमीला मातेची आराधना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. (Chaitra Navratri)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com