Yearly Horoscope | तूळ - राखा प्रसंगावधान; सुधारेल जीवनमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yearly Horoscope

वार्षिक राशिभविष्य | तूळ - राखा प्रसंगावधान; सुधारेल जीवनमान

जगाचे कल्याण करणारी तूळ रास आहे. तुमची रास कोणतीही असो; पत्रिकेत ज्या ठिकाणी ही पडलेली असते, तिथे निश्चितच काहीतरी चांगले अनुभव दिसून येतात. या राशीच्या लोकांनी आपली वस्त्रप्रावरणे, घर अथवा गाडी वगैरे सफेद रंगाची घेतल्यास त्यांचे भाग्य उजळते. त्यांना सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतो. स्वच्छता, पावित्र्य आणि मनमोहकपणा हे या राशीचे गुण आहेत. या गुणांच्या जोरावर जगात कोठेही, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल.

जीवनात कितीही कठोर प्रसंग येऊ देत, प्रत्येकाला योग्य उपाय आणि मार्ग असतातच. वावटळी येतात आणि जातात; पण काहीतरी नवी शिकवण शिकवून जातात, हे सिद्ध करणारी ही रास आहे. समतोल वृत्ती तसेच कोणावरही अन्याय होऊ नये, अशी भावना बाळगणारी ही रास आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती, आर्थिक व्यवहार, सर्व बाजारपेठा, संजीवनी मंत्र, लक्ष्मीची कृपा यावरही या राशीची मालकी आहे. राहू, गुरू, मंगळ आणि शुक्र हे सर्व जण या राशीत खूश असतात, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या राशीत सर्व देवदेवता आनंदी असतात. राशी स्वामी शुक्राची ही उच्च राशी असल्याने आनंदी वृत्ती, चैतन्य, समृद्धी, भाग्योदय, भरभराट, व्यवसाय कमी-जास्त प्रमाणात चालणे, शारीरिक आकर्षण, किडनी विकार, हर्निया दोष हेही याच राशीखाली येतात.

सर्व प्रकारच्या बाजारपेठेवर आणि उद्योगावर ही रास प्रभाव टाकत असल्याने या राशीत शनि आणि शुक्र असतात, त्या वेळी शेअर बाजार एकदम उंचावतो. ही रास बिघडल्यास शेअर बाजार एकदम खाली कोसळतो, असे दिसून आलेले आहे. जगाचे कल्याण करणारी तूळ रास आहे. तुमची रास कोणतीही असो; पत्रिकेत ज्या ठिकाणी ही पडलेली असते, तिथे निश्चितच काहीतरी चांगले अनुभव दिसून येतात. या राशीच्या लोकांनी आपली वस्त्रप्रावरणे, घर अथवा गाडी वगैरे सफेद रंगाची घेतल्यास त्यांचे भाग्य उजळते. त्यांना सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतो. स्वच्छता, पावित्र्य आणि मनमोहकपणा हे या राशीचे गुण आहेत. या गुणांच्या जोरावर जगात कोठेही, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल.

यावर्षीचे ग्रहमान कसे असेल, याचा थोडक्यात आढावा येथे घेतलेला आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक ग्रहमानानुसार त्याचे कमी-जास्त अनुभव येऊ शकतात. यावर्षी राहूचे भ्रमण मार्चपर्यंत अष्टमात आहे. सर्व कामांत अडथळे, संकट, जिवावरचे प्रसंग तसेच नोकरी-व्यवसायात गंडांतर आणणारा हा योग आहे. आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि व्यावसायिक या बाबतीत जपून राहण्यास सुचवित आहे. बाधिक दोष, वाहन अपघात, दुर्घटना व बेफिकिरीमुळे होणारे नुकसान, कोणतेही काम अर्धवट राहणे, वादावादी, आजारपण, अफाट खर्च, अचानक दुर्घटना, मानसिक चिंता असे या राहूचे फळ असते. पूर्वजांचे दोष याच कालखंडात विशेष प्रकर्षाने दिसून येतील; पण प्रसंगावधान राखून कामे केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यानंतर सप्तमस्थानी येणारा राहू वैवाहिक जीवनात काहीतरी महत्त्वाच्या घटना घडवेल. विवाहासाठी आंतरजातीय स्थळे येऊ शकतील. संपूर्ण वर्षभर शनि चतुर्थात राहणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, जागेचे व्यवहार केल्यास उत्तम चालतील. वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. मात्र, अपघात व दुर्घटना या दृष्टीने जरा काळजी घ्यावी लागेल. ज्या ज्या वेळी या शनिशी रवि किंवा मंगळाचा अशुभयोग होईल, त्या महिन्यात काळजी घ्यावी.

एप्रिलपर्यंत गुरु अत्यंत शुभयोगात आहे. विवाह, संततीलाभ, भाग्योदय, भरभराट, नावलौकिक, मानसन्मान, प्रत्येक कामात यश, लक्ष्मीची कृपा यादृष्टीने उत्तम अनुभव येतील. बुद्धिमत्ता आणि नीटनेटकेपणा यांच्या जोरावर सर्वांकडून प्रशंसा मिळवाल. शैक्षणिक क्षेत्र, कायदा क्षेत्र लाभदायी ठरेल. जे काही शिक्षण घेतले असेल, त्यातच उपजीविका होईल अथवा आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळेल. प्रशासकीय क्षेत्र, डॉक्टर, प्राध्यापक यांना उत्तम काळ. त्यानंतर गुरू षष्ठस्थानी येईल. यकृत आणि रक्त दोषापासून सांभाळावे. मामा-मावशी व मातुल पक्ष तसेच माहेरचा तुमच्यामुळे उत्कर्ष होईल.

हर्षलचे वास्तव्य संपूर्ण वर्षभर सप्तमात आहे. वैवाहिक जीवनात सांभाळून राहावे. अचानक काही विचित्र घटना घडू शकतात. संशय आणि मतभेदांना थारा देऊ नये. पती-पत्नीने एकमेकांना सांभाळून घेऊन सामंजस्याने राहणे त्यांना फायदेशीर ठरणार आहे. नेपच्यून यंदाही पंचमात राहणार आहे. प्रेमविवाह योग येतील. एका ठिकाणी बसून व्यवसाय करणे जमणार नाही. ज्या काही चांगल्या घटना घडतील, त्यात दैवी शक्तीचा प्रभाव असेल. भावनेच्या अति आहारी न जाता व्यवहारी दृष्टिकोन ठेवणे तुम्हाला लाभदायक ठरेल. डोळ्यांचे विकार आणि खर्चात वाढ तसेच स्वभावात कडकपणा निर्माण होईल. प्रवास, लिखाण, पत्रव्यवहार यास ग्रहमान अनुकूल आहे. नोकरी, उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती भेटतील. त्यांच्यामुळे तुमचे जीवनमान सुधारेल. संपूर्ण वर्ष सर्व बाबतीत मध्यम स्वरूपाचे आहे. विवाहासाठी एप्रिलपर्यंत उत्तम काळ आहे. कोर्ट प्रकरणे टाळावीत. वैवाहिक जीवनात कटुता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. आर्थिक बाबतीत मात्र मध्यम योग आहेत.

मासिक फलाफल -

 • जानेवारी - चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत काही ना काही कमीपणा जाणवत राहील. स्वाती आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वर्षभर सतत वस्त्रालंकार मिळत राहतील, असे यंदाच्या संक्रांतीचे फळ आहे. वास्तुविषयक काही कायदेशीर समस्या उद्‍भवण्याची शक्यता आहे. जरा जपून राहा.

 • फेब्रुवारी - घरातील पूर्वीची काही गुप्त प्रकरणे बाहेर पडतील. त्यातून मतभेद व संघर्षाला वाव मिळेल. गुरुची कृपा असल्याने मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. चंद्र-हर्षल योगामुळे मानसिक स्थिती चंचल राहील. महत्त्वाच्या कार्याच्या वेळी ठाम निर्णय घेणे जमणार नाही.

 • मार्च - मंगळ, शनिसह महत्त्वाचे ग्रह चतुर्थस्थानी आहेत. वास्तू आणि जागा खरेदीचे योग; पण अपघात, दुर्घटना, दुखापती, शस्त्रक्रिया, दंगली यापासून जपावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत जुन्या वस्तूंची खरेदी करू नका. त्यातून काहीतरी विपरीत घडेल किंवा अनामिक बाधेचा सामना करावा लागेल.

 • एप्रिल - सर्व कामांत यश देणारा महिना. गुरु-शुक्राच्या कृपेमुळे मोठ्या प्रमाणात धनलाभाची शक्यता. पंचमातील शनि-मंगळ युती प्रेम प्रकरणात नुकसान व फसवणूक करेल. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करेल. काही पूर्वर्जीत शापित दोष डोके वर काढतील.

 • मे - पूर्वी केव्हातरी झालेल्या आर्थिक बाबीवरून कुणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. सप्तमातील शुक्र-हर्षल वैवाहिक जीवनात खळबळ माजवण्याची शक्यता. महाविद्यालयीन जीवनातील ओळखी अथवा मेसेज वगैरे गैरसमज निर्माण करू शकतात, त्यापासून जपावे. शनिचे भ्रमण जीवनात स्थैर्य देईल.

 • जून - बुध-शुक्राचे सहकार्य आर्थिक बाबतीत उत्तम. कमी वेळेत व श्रमात महत्त्वाची कामे होतील. गैरसमज व संशयी वातावरणामुळे काही प्रकरणे नको त्या थरापर्यंत जातील. काही महत्त्वाची कामे स्वतः करा. इतरांवर चुकूनही सोपवू नका.

 • जुलै - रवि-शनी प्रतियोग आणि मंगळ-राहूची युती जीवनात काहीतरी नाट्यमय घटना घडवेल. त्याचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम होईल. कुलदेवतेची आराधना नीट सुरू ठेवा, म्हणजे कोणताही गंभीर प्रसंग आला तरी त्यातून सुटका होईल. कोर्ट प्रकरण असेल तर ते लांबणीवर टाका.

 • ऑगस्ट - मन शांत असेल तर कोणतेही काम अवघड वाटत नाही. या आठवड्यात गुरु-शुक्राचा प्रतियोग आध्यात्मिक आणि मानसिक समाधान देईल. शुक्र-शनि योग कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यास मदत करेल. रविचे भ्रमण सरकारी कामासाठी अनुकूल आहे. आवडीने जोपासलेला एखादा छंद मोठा धनलाभ देऊन जाईल.

 • सप्टेंबर - परस्परविरोधी तत्त्वाच्या प्रतियोगात ग्रहमान अडकलेले आहे. प्रत्येक गोष्ट अत्यंत विचारपूर्वक व प्रसंगावधान ठेवूनच करावी लागेल. किरकोळ चुकाही मोठे नुकसान करू शकतात. ज्यांना आपले समजत होतो, तेही धोका देऊ शकतात. मंगळाचे भ्रमण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देईल.

 • ऑक्टोबर - तुम्ही ठरवाल एक; पण होईल दुसरेच. काही कामाचे नियोजन बदलावे लागेल. स्वतः जी कामे कराल, ती यशस्वी होतील. रोज नवग्रह स्तोत्राचे वाचन सुरू ठेवा. बऱ्याच अडचणीतून मार्ग निघेल.

 • नोव्हेंबर - भावनेच्या अतिआहारी न जाता व्यवहारी दृष्टिकोन ठेवणे तुम्हाला लाभदायक ठरेल. डोळ्यांचे विकार आणि खर्चात वाढ तसेच स्वभावात कडकपणा निर्माण होईल.

 • डिसेंबर - प्रवास, लिखाण, पत्रव्यवहार यास ग्रहमान अनुकूल आहे. नोकरी- उद्योग- व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती भेटतील. त्यांच्यामुळे तुमचे जीवनमान सुधारेल. या महिन्यात पित्त व उष्णता विकारापासून जपावे लागेल.

Web Title: Check The Yearly Horoscope 2022 Libra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..