Panchang 27 April : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल l daily panchang 27 april wear yellow clothes today day will spend good | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 27 April 2023

Panchang 27 April : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २ शके १९४५

आज सूर्योदय -०६:१४ वाजता होणार तर सूर्यास्त १८:५१ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही ११:५२ तर प्रात: संध्या ही स.०५:०५ ते स.०६:१४ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही  १८:५१ ते १९:५९ दरम्यान आहे तर अपराण्हकाळ हा १३:४८ ते १६:२० दरम्यान आहे. आज प्रदोषकाळ हा १८:५१ ते २१:०७ दरम्यान आहे तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५५ दरम्यान आहे. आज राहु काळ हा १४:०७ ते ते १५:४२ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा ०६:१४ ते ०७:४८ दरम्यान आहे.

या दिवशी श्राद्धास तिथी नाही. सर्व कामांसाठी आज शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१७ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी आवळा खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. (daily Panchang 27 April 2023 )

लाभदायक -

लाभ मुहूर्त -  १२:३२ ते १४:०७

अमृत मुहूर्त - १४:०७ ते १५:४२

विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही. शुक्र मुखात आहुती आहे. शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - सप्तमी(१४:२१ प.नं. अष्टमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पुनर्वसु(०७:४५ प.नं.पुष्य)

योग - धृति(०९:२७ प.नं. शूल)

करण - वणिज(१४:२१ प.नं.भद्रा)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष (Panchang)

विशेष:- भद्रा १४:२१ ते २७:१४, गंगोत्पत्ती, गंगासप्तमी(मध्यान्हकाळी गंगा पूजन करणे), गुरुपुष्यामृतयोग-सर्वार्थामृतसिद्धियोग स.०७:४५ नं.अहोरात्र

👉 या दिवशी पाण्यात गंगाजल व हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang