Panchang 8 May : आज संकष्टी चतुर्थीला पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल l daily panchang 8 may wear white clothes today day will spend good | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 8 May

Panchang 8 May : आज संकष्टी चतुर्थीला पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक 8 मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १८ शके १९४५

आज सूर्योदय ०६:०८ वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही २१:५१ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०० ते स.०६:०८ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५३ ते २०:०१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४७ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:०९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा ०७:४४ ते ०९:१९ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १०:५५ ते १२:३१ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही तृतीया श्राद्धअसणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. सर्व कामांसाठी सायं.०७:५१ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३२ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. 

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४३ ते १७:१९

अमृत मुहूर्त--  १७:१९ ते १२:३१

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही. मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास १९:५१ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी १९:५१ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - कृष्ण

तिथी - तृतीया(१९:५१ प.नं. चतुर्थी)

वार - सोमवार

नक्षत्र - ज्येष्ठा(२०:३५ प.नं.मूळ)

योग - शिव(२५:३१ प.नं. सिद्ध)

करण - वणिज(०८:४० प.नं.भद्रा)

चंद्र रास - वृश्चिक (२०:३५ नं.धनु)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष (panchang)

विशेष:- भद्रा ०८:४० ते १९:५१, संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय- रा.०९:५१)

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकराला व गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना रा.०८:३५ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :AstrologyPanchang