पंचांग 8 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे | Daily Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
पंचांग 8 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे | Daily Panchang

पंचांग 8 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ मे २०२२ (Daily Panchang 8th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१८:५५

  • चंद्रोदय -११:५१

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १८:५५ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

  • प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - १७:१९ ते १८:५५

  • यमघंट काळ - १२:३१ ते १४:०७

  • श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०१:०६ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी आवळा खावू नये.

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 08 मे 2022

♦️ लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:१९ ते १०:५५

  • अमृत मुहूर्त-- १०:५५ ते १२:३१

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही.

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - सप्तमी(१३:०६ प.नं अष्टमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - पुष्य(११:३९ प.नं. आश्लेषा)

  • योग - गंड(१७:३९ प.नं. वृद्धि)

  • करण - वणिज(१३:०६ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 मे 2022

विशेष:- भद्रा १३:०६ ते २५:४४, भानुसप्तमी (सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), जन्हु-शर्करा-कमल सप्तमी, रविपुष्यामृतयोग-सर्वार्थसिद्धियोग ११:३९ प.

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृष, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Web Title: Daily Panchang 8th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang
go to top