दसरा 2021: जाणून घ्या दसऱ्याचा शुभ मुहूर्त

शुक्रवारी 15 ऑक्टोबरला दसरा देशभरात साजरा केला जाणार आहे
dasara ravan dahan
dasara ravan dahan

अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा मानला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवींच्या घटांची स्थापना झाल्यावर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला, अशी आख्यायिका आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी होते. वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या कार्यांची सुरूवात दसऱयापासून होते असे म्हणतात. दिवाळीच्या 20 दिवस आधी दसरा येतो. यावर्षी शुक्रवारी 15 ऑक्टोबरला दसरा देशभरात साजरा केला जाणार आहे.

हा आहे पूजेचा मुहूर्त

अश्विन मास शुक्ल पक्ष दशमी तिथीची सुरूवात 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांनी होणार असून ती 15 ऑक्टोबरला 6 वाजून 2 मिनीटांपर्यंत आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 2 मिनिटांपासून ते 2 वाजून 48 मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे.

शुभकार्यासाठी उत्तम दिवस

यादिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सरस्वती पूजन केले जाते.याशिवाय नवीन वास्तू खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदी, गृहप्रवेश अशा नव्या गोष्टी सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com