bhaubeej 2022 : यंदा भाऊबीज विधीवत साजरी करा, जाणून घ्या ओवाळणीचा मुहूर्त आणि विधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhaubeej 2022

bhaubeej 2022 : यंदा भाऊबीज विधीवत साजरी करा, जाणून घ्या ओवाळणीचा मुहूर्त आणि विधी

Bhaubeej: बहिण भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा भाऊबीज हा महत्वाचा सण आहे. या सणाला भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक मानले जाते. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या येणारा हा सण सूर्यग्रहणामुळे यावर्षी एक दिवस उशीरा साजरा होतोय. तेव्हा यंदा भाऊबीजचा शुभ मुहूर्त आणि विधी पद्धती नेमक्या काय आहेत जाणून घेऊ.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला म्हणजेच आज दुपारी 2:42 वाजता सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 वाजता समाप्त होईल. भाऊबीज सणाला यम द्वितीय असे देखील म्हटले जाते. ओवाळणीा मुहूर्त दुपारी 1:12 ते 3:27 पर्यंत असेल.

पूजेची विधी

भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावा. या दिवशी भगवान विष्णू आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला घरी बोलावून त्याची ओवाळणी करत स्वतःच्या हाताने तयार केलेले जेवण द्यावे. शुभ मुहूर्तावर भावाची ओवाळणी केल्याने जीवनात यश मिळते आणि येणारे सर्व अडथळे दूर होतात. भावाला कुंकू लावून ओवाळणी करत त्याच्या हातात संरक्षक धागा बांधावा. मग गोड खायला द्या. या दिवशी भावा- बहिणींनी एकमेकांना काही भेटवस्तू दिल्या पाहिजेत. (Bhaubeej)

हेही वाचा: Diwali Bhaubeej 2022 : ...म्हणून साजरी केली जाते भाऊबीज; जाणून घ्या पुराणातील महत्त्व

भाऊबीज 2022 पूजा मंत्र

चंदनस्य महातपुण्यं पवित्रं पाप नाशनम् ।

आपदं हरति नित्यं लक्ष्मी तिष्ठी सदा ।

कांति लक्ष्मी धृति सौख्यं सौभाग्यमातुलुं बलम् ।

ददतु चन्दनम् नित्यं सत्तम धर्यम्यः ।

टॅग्स :Diwali FestivalDiwali