
Dream Astrology : स्वप्नात जर होळी किंवा हे रंग दिसेल तर तुमच्या लव्ह लाईफवर होणार थेट परिणाम
Dream Astrology : प्रत्येक व्यक्तीला रात्री झोपताना स्वप्न पडते. काही लोकांना कधी कधी स्वप्न पडतं तर काही लोकांना दररोज स्वप्न पडतं. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही कारण असतं. हे स्पप्ने भविष्यात घडणाऱ्या गोष्टीला सुचित करतात.
स्वप्नशास्त्रात अशा स्वप्नांचे शुभ-अशुभ अर्थ सांगितले आहे. आता होळी जवळ आहे त्यामुळे सांगु इच्छिते की होळीच्या संदर्भात पडणाऱ्या स्वप्नांमागेही खूप मोठा अर्थ असतो. आज आपण स्वप्नात जर होळी किंवा काही ठराविक रंग दिसेल तर तुमच्या लव्ह लाईफवर काय परिणाम होणार या विषयी जाणून घेणार आहोत. (Dream Astrology if you seem these colors and holi in dream read its effect on your love life)
स्वप्नात जर होळीचं दहन दिसत असेल तर : स्वप्नात जर होळी जळताना दिसत असेल तर याचा खुप खास अर्थ होत असतो. या स्वप्नाचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातील लवकरच समस्या आणि अडचणी दूर जाणार आहे.
स्वप्नात होळी खेळताना दिसले तर : स्वप्नात जर होळी खेळताना दिसले तर त्याचा अर्थ होतो की लवकरच तुमच्या आयुष्यात शुभ गोष्टी होणार आहे. विशेष म्हणजे याचा संबंध तुमच्या आयुष्यातील नात्यांवर होतो. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला पार्टनर मिळू शकतो.
स्वप्नात स्वत:ला गुलाबी रंगाने होळी खेळताना पाहिले तर : स्वप्नात स्वत:ला गुलाबी रंगाने होळी खेळताना पाहणे, शुभ संकेत असतो. यामुळे आयुष्यात प्रेम वाढत जातं
स्वप्नात लाल रंग दिसत असेल तर : स्वप्नात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या मार्गात अडचणी येऊ शकतात.
स्वप्नात काळा रंग दिसत असेल तर : स्वप्नात जर तुम्ही काळ्या रंगाने होळी खेळताना दिसणे शुभ नसते. अडचणी येणार असल्याचे संकेत असतं. असं स्वप्न पडलं तर सावध राहा.