Dream Astrology : जर स्वप्नात दिसत असतील तर समजा यंदा होणार शुभ मंगल l Dream Astrology Marriage Signs In Your Dream | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dream Astrology

Dream Astrology : जर स्वप्नात दिसत असतील तर समजा यंदा होणार शुभ मंगल...

Marriage Signs In Your Dream : ज्योतिषशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, अंक ज्योतिष, स्वप्नशास्त्र असे विविध प्रकारचे शास्त्र आहेत. ज्यात तुमच्या भविष्याचे आडाखे घेतले जातात. असंच स्वप्नशास्त्रात तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांविषयी त्यात दिसणाऱ्या गोष्टींचे संकेत काय आहेत, भविष्यात काय घडू शकतं याचे अंदाज वर्तवले जातात.

असं म्हणतात स्वप्नांचं वास्तविक जीवनाशी घनिष्ठ संबंध असतो. काही स्वप्न चांगले असतात तर काही वाईट असतात. तर काही स्वप्न फारच खास असतात. असंच काही खास जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर समजून घ्यावे तुमच्या घरी लवकरच शुभमंगल होणार आहे. लवकरच तुमचे लग्न होऊ शकते. तर असे कोणते खास स्वप्न असतात जाणून घेऊया...

Dream Astrology

Dream Astrology

दागिने घालताना दिसणे - जर तुम्ही दागिने घालतानाचे स्वप्न बघत असाल तर याचा अर्थ असतो की लवकरच तुमचं लग्न होणार आहे. म्हणजेच लवकरच चांगलं स्थळ भेटणार आहे.

आनंदी वातावरण - जर स्वप्नात तुम्ही डान्स करत असाल तर याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी शहनाई वाजणार. तेच जर विवाहित लोकांना स्वप्नात ते डान्स करताना दिसत असतील तर त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखमय होणार आहे असा अर्थ होतो.

Dream Astrology

Dream Astrology

जोडिदारासोबत फिरायला जाणे - जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही जोडिदारासोबत जत्रेत वगैरे फीरायला जाताना दिसत असाल तर हे संकेत आहेत की, लवकरच तुमचं लग्न होणार आहे.

मध दिसणे - स्वप्नात मध दिसणे हे शुभ मानलं जातं. या स्वप्नाचा अर्थ असतो की, लवकरच तुमचं लग्न होणार आहे. विशेषतः स्वप्नात मध खाताना दिसणं फारच शुभ मानलं जातं.

मोरपीस दिसणं - स्वप्नशास्त्रात मोरपीस दिसणं फारच शुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रात याचा अर्थ मानला जातो की, हे तुमचं लग्न लवकरच होण्याचे संकेत आहे. लग्नात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :marriageAstrologyDream