Dream Astrology : ही काही स्वप्न बदलून टाकतील तुमचं भाग्य, मिळेल धनवान पार्टनर l dream astrology these dreams gives signs of marriage and rich life partner | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dream Astrology

Dream Astrology : ही काही स्वप्न बदलून टाकतील तुमचं भाग्य, मिळेल धनवान पार्टनर

Dream Astrology : स्वप्न आपल्या प्रत्येकालाच पडत असतात. मात्र काही विशिष्ट स्वप्नांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. जगात क्वचितच असा माणूस असेल, ज्याला स्वप्ने पडत नसतील. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. ते भविष्यात घडणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांबद्दल आपल्याला काही संकेत देत करतात. मात्र स्वप्नातील संकेत ओळखता आले तर तुम्हाला पुढे घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेचा अंदाज लावता येऊ शकतो.

जर तुम्ही स्वप्नात भक्तिभावाने पूजा करताना दिसले तर याचा अर्थ देवाने तुमचे ऐकले आहे आणि लवकरच प्रेमविवाह होणार आहे. जर एखाद्या मुलीने स्वप्नात तिच्या नवऱ्याला जळता कंदील घेऊन जाताना पाहिले तर असे समजावे की तिचे लग्न श्रीमंत घरातील देखण्या तरुणाशी होईल. (Astrology)

स्वप्नात बेडूक पाहणे हे प्रेमींसाठी खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ प्रेमाचा विजय होईल. जर एखाद्या मुलीला स्वप्नात दिसले की ती आलिशान पॅलेसमध्ये मेजवानीचा उपभोग घ्यायला किंवा समारंभात जात आहे, तर तिचे लग्न एखाद्या श्रीमंत माणसाशी होईल.

Dream Astrology

Dream Astrology

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला पिताना पाहिले तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुम्हाला वैवाहिक सुख मिळेल. जर एखादा पुरुष किंवा स्त्री स्वप्नात आपल्या प्रियकरासह उद्यानात फिरताना दिसली तर त्यांच्या प्रेमाचे भविष्य उज्ज्वल आहे.

जर एखाद्या मुलीने स्वप्नात स्वतःला मित्राने दिलेले ब्रेसलेट घातलेले पाहिले तर तिचे लवकरच लग्न होईल. जर स्वप्नात एखादे मूल हाक मारताना दिसले तर समजावे की तुमच्या प्रियकराने दुसऱ्या स्त्रीशीही संबंध प्रस्थापित केले आहेत.

जर एखाद्याला स्वप्नात कोणी कांदा खाताना दिसले तर त्याला त्याच्या प्रेयसी/प्रियकराकडून खरे प्रेम मिळेल. जर अविवाहित व्यक्ती मित्राच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना दिसली तर समजावे की त्याला धनाचा लाभ होईल आणि त्याचे लग्नही निश्चित होईल. ,