Guru Gochar 2023 : होळीनंतर या राशींच्या संपत्तीत वाढ होईल, प्रत्येक क्षेत्रात मिळेल भरभरून यश

चला तर येत्या दिवसांत कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊया
Guru Gochar 2023
Guru Gochar 2023esakal

Jupiter Transit in Aries Effect : या वर्षीच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाले आहेत. हिंदू धर्मात ग्रह ताऱ्यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडतो.

ज्योतिषशास्त्रात या ग्रहांमुळे आपल्या भविष्यात काय चांगलं काय वाईट होणार याचे संकेत देण्यात येतात. अशातच होळीनंतर काही राशींचं भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देवगुरु गुरु हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. त्याला वैभव, संपत्ती, संपत्तीचा ग्रह म्हटलं जातं. चला तर येत्या दिवसांत कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊया.

यंदाची होळी कधी आहे?

यंदा होळी मार्च महिन्याच्या सुरूवातीला येणार आहे. होळीनंतर म्हणजेच 22 एप्रिल 2023 रोजी बृहस्पती मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे गुरू तब्बल 12 वर्षांनी मेष राशीत प्रवेश करत असल्याने 12 वर्षांनंतर मेष राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग होणार आहे. ही युती अनेक राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येईल.

या राशींवर विशेष कृपा

मेष - गुरुच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशीचे भाग्य उजळणार आहे. नोकरीवर्गातील लोकांना आनंदाची बातमी मिळेल. त्यांची पदोन्नती होईल. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल.

सिंह

गुरुचं संक्रमण हे सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर होणार आहे. त्यांचा आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं झीज होणार आहे. कारण या संक्रमणामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फायदा होणार.नोकरीत प्रमोशन मिळणार आहे.

मीन

या राशीसाठी गुरुचं संक्रमण म्हणजे छप्पर तोड पैशांची बरसात असणार आहे. त्यांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. व्यवसायदारांसाठी मोठी संधी चालून येणार आहे. मोठा व्यवसाय करार निश्चित होण्याची शक्यता आहे. (Astrology)

Guru Gochar 2023
Horoscope 31 January : या राशींमधे आज भांडण अन् चिडचिड, संयम ठेवा...

मीन राशीतील देवगुरु बृहस्पति मार्गी लागणार

देव गुरु बृहस्पति 13 एप्रिल 2022 ला मीन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर 24 जुलै 2022 ला तो मीन राशीतून मागे सरकतो. त्यानंतर गुरु पुन्हा एकदा 24 नोव्हेंबर 2022 ला मीन राशीत गेला होता. पुढे तो 24 नोव्हेंबरच्या पहाटे 4.27 पासून मीन राशीत सरळ रेषेत फिरत आहे. मेष राशीत प्रवेश करण्यापूर्वी तो 22 एप्रिल 2023 पर्यंत येथून मार्गक्रमण करेल. (holi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com