
गुरुमाऊली जयंती महोत्सवाला भक्तीमय प्रारंभ
अकोट : गुरुमाऊली श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १०५ वा जयंती महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. श्री ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डाॕ.गोपाल महाराज झामरे यांचे हस्ते भागवत ध्वज पूजनाने या भक्ती सोहळ्याचे उद्घाटन पार पडले.
यावेळी संस्थाध्यक्ष वासुदेव महाराज महल्ले, उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे, सचिव रवींद्र वानखडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सहसचिव मोहन जायले, अवी गावंडे, विश्वस्त प्राचार्य गजानन चोपडे, अशोकराव पाचडे, दिलीप हरणे, अनिल कोरपे, गजानन दुधाट, कानुसेठ राठी उपस्थित होते. दरम्यान गुरुमाऊली जयंती महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम व श्री ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ झाला.
संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दादाराव पुंडेकर व पुष्पाताई पुंडेकर यांचे हस्ते तीर्थ स्थापना व गुरुपूजन पार पडले. पहाटे ‘श्रीं’ महाभिषेक व आरती विश्वासराव वालसिंगे, बंडू पाटील ठाकरे, शंकरराव लोखंडे, वामनराव लोखंडे, एकनाथ लोखंडे यांचे हस्ते पार पडले. श्री ज्ञानेश्वरी पूजनाने सामूहिक पारायणाला सुरुवात करण्यात आली. पारायणपीठाचे नेतृत्व अंबादास महाराज मानकर करत आहेत.
श्री ज्ञानेश्वरी चिंतनात ‘स्व’ची जाणिव होते!
श्री ज्ञानेश्वरी श्रवण मनन चिंतन केल्यास मनुष्याचे मनातील विकार नष्ट होवून हृदयी सात्विकतेचा पाझर फुटतो, समाधीवस्था प्राप्त होते. ही सहृदयीच्या प्रसन्नतेत सर्व सुख प्राप्त होते. ज्ञानेश्वरी चिंतनात ‘स्व’ ची जाणिव होते. म्हणूनच प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असे, चिंतन ज्ञानेश्वरी ग्रंथराजातील भाव उलगडतांना चिंतन गोपाल महाराज यांनी मांडले.
Web Title: Gurumaulis Jayanti Festival Devotional Start
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..