Garud Puran : गरुड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, मिळतात चमत्कारीक फायदे; पण l Hindu Religion Garud Puran importance wealth health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garud Puran

Garud Puran : गरुड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, मिळतात चमत्कारीक फायदे; पण...

Hindu Religion Garud Puran : हिंदू धर्मात १८ महापुराणांचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक गरुड महापुराण आहे. याच्या पठणाने माणसाला यशस्वी आणि आनंदी जीवनाची अनेक रहस्य उलगडतात असं म्हणतात. यात माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गरुण पुराणात लोकांना साधे जीवन जगण्याचे सांगितले आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ दिवस गरुड पुराणाचा पाठ केला जातो. यामुळे निवृत्त आत्म्याला शांती आणि सदगती मिळते.

गरुड पुराणात सांगितलेले मंत्र

या मंत्रांच्या नियमित आणि नियमानुसार पठण केल्याने व्यक्तीला रोग आणि मृत्यूचे भय राहत नाही. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.

गरिबी दूर करण्यासाठी मंत्र

जर तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर गरुड पुराणात यासंदर्भात शास्त्र सांगण्यात आलं आहे. या मंत्र जपाने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते असे सांगण्यात आले आहे.

मंत्र- ज्योतिषशास्त्रानुसार ‘ओम जुनं सह’ मंत्राचा जप केल्याने लवकर लाभ होतो. यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठ करण्याचा सल्ला देखील दिला जातो.असे सतत 6 महिने केल्यास धनाशी संबंधित समस्यांपासून लवकरच मुक्ती मिळते.

निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी

भगवान विष्णूंनी सांगितलेल्या संजीवनी मंत्राचा उल्लेख गरुड पुराणातही आहे. या मंत्राच्या जपाने निरोगी शरीर मिळते असे म्हटले जाते. सिद्ध व्यक्तीच्या संपर्कातच हा जप करावा असे सांगण्यात आले आहे.

मंत्र- ‘यक्षी ओम ओम स्वाहा’ या मंत्राचा संपूर्ण नियमांसह जप करावा. असे म्हणतात की जर एखाद्याने नियम जाणून घेतल्याशिवाय जप केला तर त्याचे फळ मिळणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :AstrologyHindu religion