
Hindu Rituals : व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचं मुंडण का करतात? पुराणात सांगितलंय कारण...
Hindu Rituals : हिंदू धर्मात रूढी परंपरांना फार महत्व आहे. बाळाच्या जन्मापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत आयुष्यभर व्यक्ती वेगवेगळ्या रूढी परंपरा पाळत असतो. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराबाबत काही नियम दिलेले आहेत. असे केल्याने आत्म्याला मुक्ती मिळते असे मानले जाते. हे नियम पाळले नाहीत तर त्याचा आत्मा पृथ्वीवर फिरतो असे म्हणतात. अंत्यविधीच्या वेळी मुंडण करण्याचा नियमही असाच आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
मृत व्यक्तीस सन्मान आणि त्याच्याप्रती श्रद्धा प्रकट करण्यसाठी
व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबिय त्याच्याप्रती श्रद्धा प्रकट करण्यासाठी मुंडण करतात.
जीवाणूंपासून बचाव करण्यासाठी
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचे शरीर सडण्यास सुरुवात होते. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. या दरम्यान कुटुंबातील सदस्य घरापासून स्मशानभूमीपर्यंत अनेकवेळा मृतदेहाला स्पर्श करतात, त्यामुळे ते त्या हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येतात. ते बॅक्टेरियाही केसांना चिकटून राहतात. आंघोळ केल्यानंतरही हे बॅक्टेरिया केसांना चिकटून राहातात, त्यामुळे केस काढले जातात.
सूतक पूर्ण करण्यासाठी
हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवस कुटुंबात सूतक पाळले जाते. यावेळी कुटुंबातील सदस्यांना धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात सूतक असते, या काळात धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. मुंडण केल्यानंतरच सूतक पूर्ण होते. (Hindu religion)
गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. यमराजाची कळकळीची विनंती करून ती यमलोकातून परत येते आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. शरीर नसल्यामुळे तिच्याशी संपर्क साधण्यासाठी ती घरच्यांच्या केसांचा आधार घेते.