Holi 2023 : होळीच्या दिवशी न विसरता या ५ शुभ वस्तू आणा, चारही दिशांनी होईल धनवर्षाव l Holi 2023 Astro Tips For Wealthy Life buy these things | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi 2023

Holi 2023 : होळीच्या दिवशी न विसरता या ५ शुभ वस्तू आणा, चारही दिशांनी होईल धनवर्षाव

Astro Tips For Wealthy Life : हिंदू धर्मात होळीला फार महत्व देण्यात आलं आहे. होळीच्या दिवशी अनेक उपाय सुचवले जातात, ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. जर तुम्हीही कोणत्या आर्थिक समस्यातून जात असाल तर हे उपाय तुम्हालाही फायदेशीर ठरू शकतात. आज अशाच ५ गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल.

धातूचा कासव - वास्तूशास्त्रानुसार कासवाला शुभ मानलं गेलं आहे. होळीच्या मुहूर्तावर तुम्ही पंचधातूंनी बनलेला कासव आणू शकतात. या कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असायला हवं. ज्या घरात धातूचा कासव उत्तर दिशेला आतल्या बाजूने तोंड करून ठेवला जातो तिथे पैशाची कधी कमी जाणवत नाही.

पिरॅमिड - वास्तूशास्त्रानुसार पिरॅमिडमध्ये धन आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते. ज्या घरात किंवा ऑफीसमध्ये पिरॅमिड असते तिथे धन प्राप्तीचे मार्ग आपोआप उघडतात.

आंब्याचे किंवा अशोकाचे तोरण - होळीला आपल्या घराच्या मुख्यद्वारावर एक तोरण नक्की लावावे. हे तोरण आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे असावे. होळीच्या दिवशी सकाळीच हे तोरण लावावे. असं म्हणतात की, हे तोरण घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तींना थांबवतात.

बांबूचे झाड - होळीच्या दिवशी घरात (ड्रॉइंग रुम) बांबूचं रोप ठेवावं. बांबूचं रोप फारच शुभ मानलं जातं. पण यात ७ किंवा ११ स्टीक असतील अशी काळजी घ्या. या रोपाला फारच लकी समजलं जातं. ज्या घरांमध्ये हे रोप असतं तिथे कायम माता लक्ष्मीची कृपा बरसते. दीर्घायुसाठीही घरात हे रोप ठेवलं जातं.

वास्तू देवाचा फोटो - जर तुमच्या घरात वास्तू दोषाशी निगडीत कोणती समस्या असेल तर घरात वास्तूपुरुषाचं चित्र नक्की लावा. त्यांच्या उपस्थितीने सगळा वास्तूदोष निघून जातो.

टॅग्स :HoliAstrologyvastu tips