
Holashtak 2023 : आजपासून होलाष्टकाला सुरुवात, या 4 चुका टाळा अन्यथा घडेल अशुभ...
Holashtak 2023 : सोमवार म्हणजेच आजपासून होलाष्टकाला सुरुवात झाली आहे. या काळात कुठलेही शुभकार्य करु नये अशी मान्यता आहे. आजपासून पुढले ९ दिवस अशुभ मानले जाते. पण देवतांची पूजा करण्यासाठी हे दिवस खूप शुभ मानले जातात. तसं तर होळीच्या 8 दिवसांपूर्वी होलाष्टकाला सुरुवात होते. मात्र यंदा होलाष्टक 9 दिवस असणार आहे. त्यानुसार होलाष्टक 7 मार्चला संपणार आहे. आता आजपासून लग्न, मुंडण, घर, वाहन आणि जमीन खरेदी विक्री यासारखे काम चुकूनही करायचे नसतात. धार्मिक शास्त्रांमध्ये होलाष्टकादरम्यान काही गोष्टी करण्यास मनाई आहे.
तर ज्योतिषशास्त्रानुसार होळी आणि अष्टक यांपासून होलाष्टक हे तयार झालं आहे. पौराणिक कथेबद्दल बोलायचं झालं तर राजा हिरण्यकश्यपने आपला मुलगा प्रल्हाद यांची भगवान विष्णूची भक्ती तोडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी प्रल्हादचा 8 दिवस छळ केला. त्यानंतर आठव्या दिवशी हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका आणि प्रल्हादला होलिकामध्ये भस्म केलं.
अग्नीचा लाटातूनही प्रल्हाद जिंवत होता. त्यामुळे हे आठ दिवस अशुभ मानले जातात. शिवाय होलिकाला वरदान होते की तिचा कधी नाश होणार नाही. तेव्हापासून देशभरात होलिका दहन केले जातं. म्हणजे नकारात्म गोष्टींचं दहन केलं जातं.
होलाष्टकात 16 संस्कारांना महत्त्व
हिंदू धर्मानुसार होलाष्टकात 16 संस्कारांसह कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. मात्र या आठ दिवसांमध्ये दानधर्म केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं. शास्त्रानुसार या दिवसांमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने खूप फायदा होता.
होलाष्टकात या गोष्टी अजिबात करु नका
वाह, मुंडण, पवित्र धाग्याचा सोहळा, गृहप्रवेश करु नयेत.
कोणतेही शुभ कार्य करू नयेत.
नवीन वाहन खरेदी करू नयेत.
घराचे बांधकाम सुरु करू नयेत.
घर खरेदी किंवा विक्री करू नयेत. (Astrology)
होलाष्टकाला या गोष्टी करणे शुभ मानल्या जातं
- प्रार्थना पाठ आणि देवाची पूजा अर्चा करा.
- दानधर्म करणे अत्यंत शुभ
- जास्त जास्त वेळ देवपूजेत व्यतित करावे.
- महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. (Holi)