Holi Special Horoscope : या राशींसाठी होळी ठरणार लकी, हे रंग उधळा अन् बघा चमत्कार l holi 2023 horoscope these zodiac signs are lucky today know rashifal and lucky color | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Special Horoscope

Holi Special Horoscope : या राशींसाठी होळी ठरणार लकी, हे रंग उधळा अन् बघा चमत्कार

Holi Special Horoscope : आज होलिका दहनाचा दिवस असून संपूर्ण भारतात आज होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल. त्यातत ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हा दिवस फार शुभ ठरणार आहे. त्यांच्या भाग्यात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तेव्हा या लकी राशी कोणत्या आणि त्यांचा होळीसाठी लकी रंग कोणता ते जाणून घेऊयात.

राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज सोमवार ६ मार्च २०२३. आजच्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया.

मेष रास

या राशीसाठी आज शुभ दिनमान राहील. प्रतिभेस वाव मिळेल. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकेल. व्यापारीवर्गासाठीही अनुकूल वातावरण आहे. धनप्राप्तीत वाढ होईल. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी योग्य दिनमान आहे. तसेच या राशीसाठी आज शुभ रंग तांबूस असणार आहे.

शुभ रंग - तांबुस

मिथुन रास

आज शुभ दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून उत्तम कार्य घडतील. विद्वत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद आणि मान सन्मान वाढेल. भांवंडाकडून मोठं सहकार्य मिळणार आहे. नोकरी व्यवसायात भरभराटीचा दिवस आहे. मनासारख्या घटना घडतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल. आनंदाचं प्रसन्न वातावरण राहिल. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. दिनमान उत्तम राहील. संततीकडून सुख समाधान लाभेल. तसेच आज होळीसाठी या राशींचा शुभ रंग पोपटी असणार आहे.

शुभ रंग : पोपटी

धनु रास

आज उर्जादायक दिवस आहे. दिनमान उत्साहवर्धक राहील. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्साहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.

शुभ रंग :पांढरा

कुंभ रास

आज आर्थिक दृष्टीकोनातून दिवस भाग्यकारक आहे. मनात प्रसन्नता राहील. आंनददायी वातावरणात राहील. लेखन कार्यात मानसन्मान मिळेल. कुटुंबात खर्च कराल. आत्मसुख आणि आनंदाची प्रचिती घ्याल. रोजगारात प्रगतीला पोषक दिवस आहे. नोकरी व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल. (Holi)

शुभ रंग - जांभळा

मीन रास

आज कौटुंबिक सौख्य उत्तम मिळणार आहे. प्रसन्नतापूर्वक दिवस व्यतीत होईल.घरात नातेवाईकांचे आगमन होईल. संततीकडूनही समाधानकारक स्थिती राहील. आज स्वत:वरचा विश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी येतील. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल. वातावरण अनुकुल आहे. आर्थिक उत्पन्न वाढीस लागेल. (Horoscope)

शुभ रंग : पिवळा