Holi Astrology : होळीच्या दिवशी या गोष्टी करा, मिळेल बागेश्वर धामसारख्या सिद्धी l Holi Astrology 2023 bageshwar dham tips siddhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Astrology

Holi Astrology : होळीच्या दिवशी या गोष्टी करा, मिळेल बागेश्वर धामसारख्या सिद्धी

Holi 2023 : होळीचा सण जवळ आला आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण फार शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. त्यामुळे होळीच्या दिवशीही काही गोष्टी करणे महत्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. जर काही सोपे उपाय या काळात केले तर सर्व समस्यांतून मुक्तता मिळू शकते. असेच काही उपाय आज सांगणार आहोत.

तंत्र-मंत्रांची सिद्धी मिळवण्यासाठी

दिवाळी आणि होळी हे सण तंत्र-मंत्र सिद्धी मिळवण्यासाठी विशेष मानले गेले आहेत. अशावेळी जर तुम्हाला कोणता मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी हा दिवस फार चांगला समजला जातो. तुमचा गुरुमंत्राचा जर तुम्ही या दिवशी १० हजार वेळा जप केला तर तुम्ही हा मंत्र सिद्ध करू शकतात. यामुळे तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊ शकते. या उपायांनी तुम्ही बागेश्वर धामसारखीही सिद्धी प्राप्त करू शकतात.

भूत-प्रेत अशा नकारात्मक शक्तींच्या निवारणासाठी

होळीच्या दिवशी गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा ५१ माळा जप करावा. त्यानंतर त्याच मंत्राचे हवन करावे. या उपायाने होळीच्या दिवशी तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता पळून जाईल. घराची पुर्ण शुद्धी होऊन तुमचं भाग्य उजळेल.

करिअर किंवा व्यवसायात वृद्धीसाठी

बऱ्याचदा तुम्ही भरपूर प्रयत्न करूनही प्रगती काही होत नाही. शिवाय व्यवसायात वृद्धी होत नाही. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी आदित्य हृदय स्रोतचा १०८ वेळा जप करणं उपयुक्त ठरतं. शिवाय गुरुंच्या आज्ञेनुसार त्यादिवशी तुम्ही हे सिद्ध करू शकतात. नंतर रोज ११ वेळा जप करा. या उपायाने तुम्ही तुमचं करिअर आणि आर्थिक स्थिती सुधारू शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :HoliAstrology