Shravan Month: येत्या नव्या वर्षात श्रावण महिना लांबणार! इतके दिवस खावं लागेल तुम्हाला व्हेज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan Month

Shravan Month: येत्या नव्या वर्षात श्रावण महिना लांबणार! इतके दिवस खावं लागेल तुम्हाला व्हेज...

Shravan Month 2023: नवं वर्ष सुरू होण्याआधीच आता सगळ्यांचं लक्ष नव्या वर्षात येणाऱ्या वेगवेगळ्या सणांकडे लागलेले आहे. विशेष म्हणजे पुढचं वर्ष १२ नाही तर १३ महिन्यांचं असणार आहे. म्हणजेच येत्या २०२३ या वर्षात एक महिना अधिक असणार आहे.

श्रावण महिना 30 ऐवजी 60 दिवसांचा असणार आहे. यामुळे चातुर्मास 4 महिन्यांऐवजी 5 महिन्यांचा असेल. हिंदू वर्षानुसार तिथी कमी अधिक असल्याने 11 दिवस घटतात. तसेच 3 वर्षात ही संघ्या 30 ते 33 होते.

तेव्हा कमी झालेले दिवस बरोबर करण्यासाठी अधिक मास येते. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास बोललं जातं. 2023 या वर्षात पुरुषोत्तम मास 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर श्रावण महिना 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

अधिक मास का लागतो?

सूर्य वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचं असतं. तर चंद्र वर्षे 354 दिवसांचं असतं. सूर्य वर्ष आणि चंद्रवर्षात 11 दिवसांचं अंतर असतं. हे अंतर कमी करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी एक अधिक मास असतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक तीन वर्षात एक अधिक मास असतो.

अधिक मासात या बाबी आवर्जून लक्षात ठेवा

अधिक मास हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णुची पूजा केली जाते. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास संबोधलं जातं. या महिन्यात पूजा पाठ केल्याने तिप्पटीनं फळ मिळतं. पण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. (Sanskruti)

हेही वाचा: Year End Horoscope: वर्षाच्या शेवटच्या वीस दिवसांत या पाच राशींचं बदलणार नशीब; तुमची रास कोणती?

आज आपण श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ते बघणार आहोत

  • अधिक मासात विवाह करू नये. या महिन्यात विवाह करणे अशुभ मानलं जातं. या महिन्यात विवाह केल्यास शारीरिक मानसिक सुख मिळत नाही. जीवन निरागस होतं. अशी मान्यता आहे.

  • अधिक मासात नव्या कामाची सुरुवात करु नये. अन्यथा धनहानी होण्याची शक्यता असते. कामात यश मिळत नाही.

  • अधिक मासात गुंतवणूक करू नये. प्रॉपर्टी दागिने खरेदीसाठी नवरात्रीपर्यंत वाट पाहावी. अधिक मासात घर बांधू नये.