
Shravan 2022: आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. थोडक्यात काय तर आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षाची श्रावणाची सुरुवातच ही जरा-जिवंतिका पूजनाने झाली आहे. महाराष्ट्रात जरा जिवंतिका पूजा श्रावणातील दर शुक्रवारी करण्याची पद्धत आहे.याच निमित्ताने जरा जिवंतिका पूजेची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
जरा -जिवंतिका पूजा नेमकी कशी केली जाते ?
महाराष्ट्रात अशीच जिवंतिची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतीची आणि जिवती देवीची पूजा केली जाते. जिवंतिका पूजेसाठी महिला या निर्जळी उपवास करतात. देवी जिवंतिची पूजा करुन तिच्याकडे आपल्या बाळांच्या रक्षणासाठी मनोभावे आराधना करतात . या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असणं आवश्यक मानले जाते. या पाना फुलांची माळ करुन ती जिवंतिला वाहिली जाते.
21 मणी असलेले कापडाचे वस्त्र करुन ते घालावे.नंतर 11 पुरणाचे दिवे करून त्याचा नैवेद्य जिवंतिका पूजे पुढे ठेवला जातो. सोबतच साखर, चणे, फुटाणे याचा नैवद्य दाखवला जातो. या पूजेसोबत तुम्ही तुमच्या घरातील भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मुर्तीला अभिषेक करावा आणि कुबेरास कापसांचे वस्र करुन वाहावे, त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी नांदेल.
या पूजेच्या दिवशी काय करावे ?
या पूजेच्या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करूनच ही पूजा करावी.जिवतीची पूजाचा विधी झाला की मग आपल्या मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे.पुजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी आपल्या परिसरातील सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावे. अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा.
जरा जिवंतिका पूजनाची कथा :
जरा जिवंतिका पूजनाच्या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितलेली कथा अशी सांगते की, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.
टीप: यावर्षी जरा जिवंतिका पूजा ही 29 जुलै, 5 ऑगस्ट12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 26 ऑगस्ट या दिवशी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.