
Kalashtami 2023 : कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, महत्व अन् शुभ मुहूर्त
Kalashtami 2023 : देवो के देव महादेव अशी ज्यांची ख्याती आहे असे महादेव त्यांची भक्ती केल्यास लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात. ते भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. कालाष्टमी दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. यंदा ही तिथी १२ मे २०२३ ला आहे. जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी संपूर्ण भक्तीभावाने भैरवाची पूजा करतो त्यांची कष्ट आणि संकटं दूर होतात.
कालाष्टमी तांत्रिकांसाठीसुद्धा महत्वाची मानली जाते. तंत्र विद्या शिकणारे लोक कालभैरवची पूजा करतात आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनुष्ठान करतात.
शुभ वेळ
कालाष्टमी तिथी 12 मे रोजी सकाळी 9.06 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वाजता समाप्त होईल. मात्र, मान्यतेनुसार काल भैरवाची पूजा रात्री केली जाते. असे असताना 12 मे रोजीच व्रत केले जाणार आहे. (Sanskruti)
पूजा विधी
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून तयार व्हा. उपवास करणारे लोक काळे कपडे घालू शकतात. यानंतर कालभैरवाचे ध्यान करताना हातात गंगाजल घेऊन उपवासाचा संकल्प करावा. कालभैरवाला धोतऱ्याचे फूल, दूध, दही, बेलपत्र, धूप, दिवा, फळे, फुले, पंचामृत अर्पण करा आणि कालभैरवाच्या मंत्रांचा जप करा. संध्याकाळी आरती केल्यानंतर फळे खा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर गरजूंना दान करा. (Lord Shiva)