Aaghori: स्मशानातली पुजा आणि अघोरी पंथ | Mysterious rituals of Aghori baba | Hindu Religion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mysterious rituals of Aghori baba

Aghori: स्मशानातली पुजा आणि अघोरी पंथ

अघोरी हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर एक विचित्र चित्र तयार होतं. विवस्त्र, अंगारा राख फासलेले आणि जटाधारी अघोरी बाबा डोळ्यासमोर येतात. Know About Aghori Sect in India and its rituals

अघोरी म्हणजे स्मशानात Crematorium बसून मंत्र-तंत्र पठण करणारे, भूत प्रेतांशी Ghosts संवाद साधणारे काहीसे राक्षसी वाटणारे असे हे अघोरी असा अनेकांचा समज असतो. मात्र मुळात अघोरी या शब्दाचा चुकीचा अर्थ सामान्यांमध्ये प्रचलित झाला आहे आणि त्यामुळेच या अघोरींची प्रतिमा देखील चुकीच्या पद्धतीने रेखाटली गेली आहे.

संस्कृत भाषेनुसार Sanskrit Language अघोरी म्हणजे प्रकाशाच्या दिशेने असा सांगण्यात आला आहे. अघोरी म्हणजेच अशी व्यक्ती जिला भय नाही, जो अगदी सरळ आणि जो भेदभाव करत नाही. अध्यात्मानुसार अघोरी बनण्याची पहिली पायरी म्हणजे मनातून द्वेष किंवा घृणा काढून टाकणं. म्हणूच समाज ज्या गोष्टींचा द्वेष किंवा घृणा करतं ती गोष्ट अघोरी स्विकारतात.

पुराणानुसार भगवान शंकराने अघोर पंथाची निर्मिती केल्याचं म्हंटलं जातं. महादेवाचा अवतार असलेले भगवान दत्तात्रय यांना देखील अघोरशास्त्राचं गुरू मानलं जातं. अघोर संप्रदायातील लोक हे महादेवाचेच अनुयायी असतात. ते महादेवाची मोठ्या निष्ठेने पूजा करतात.

असं करतात स्मशानात ध्यान

अघोरी हे कायम स्मशानात मंत्र-तंत्र पठण करतात. अघोरी तीन प्रकारे साधना म्हणजेच ध्यान-धारणा करतात. यात पहिली म्हणजे स्मशान साधना, दुसरी शिव साधना आणि तिसरी शव साधना. संपूर्ण देशभरामध्ये अघोरींचं वास्तव्य असलं तरी अशा प्रकारची साधना ते कामाख्या पीठातील स्मशानभूमी, तारापीठ, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैनच्या चक्रतीर्थ इथं करतात.

अघोरी जेव्हा एखाद्या शवावर पाय ठेवून ध्यान करतात तेव्हा त्याला शिव आणि शव साधना असं म्हंटलं जातं. या पूजेमागे शिव शंकराच्या छातीवर पार्वती मातेचा पाय असल्याचा समज मानला जातो. या साधनेत प्रसाद म्हणून मृतदेहांना मासं आणि मद्य अर्पण केलं जातं.

तर स्मशान साधनेत कुटुंबातील सदस्यांना देखील अघोरी सहभागी करतात. या साधनेमध्ये चितेची पूजा केली जाते आणि प्रसाद म्हणून मांस अर्पण केलं जातं.

पुराणानुसार भगवान शंकराने अघोर पंथाची निर्मिती केल्याचं म्हंटलं जातं. महादेवाचा अवतार असलेले भगवान दत्तात्रय यांना देखील अघोरशास्त्राचं गुरू मानलं जातं. अघोर संप्रदायातील लोक हे महादेवाचेच अनुयायी असतात. ते महादेवाची मोठ्या निष्ठेने पूजा करतात.

हे देखिल वाचा-

कच्च्या मांसाचं सेवन

अघोरी स्मशानातील मृत शवांच्या मांसाचं सेवन करत असल्याचं काही बोललं जातं. अघोरी स्मशानात राहतात आणि तिथल्या अर्धवट जळलेल्या शवांच्या मांसाचं सेवन करतात असे म्हणतात. यामुळे त्यांना तंत्र विद्येसाठी शक्ती मिळते असं म्हंटलं जातं.

शवांसोबत शारीरिक संबध

अघोरी बाबा प्रेतांशी शारीरिक संबध ठेवत असल्याचं म्हंटलं जातं. शिवाय स्वत: अघोरी बाबांनी देखील हे सत्य उघडपणे स्विकारलं आहे. प्रेतांशी संबंध म्हणजे शिव आणि शक्तीची उपासना असल्याची त्यांची धारणा आहे. अघोरी बाबांच्या मते शवासोबत शारिरीक संबंध ठेवत असताना जर मन ईश्वर भक्तीत एकाग्र केलं तर त्यांना अधिक शक्ती प्राप्त होते आणि ते भक्तीचा मोठा पल्ला गाठतात.

नरमुंडी धारण करणं

अघोरी बाबा आपल्यासोबत नरमुंडी म्हणजे मानवी डोक्याची कवटी ठेवतात. याला कपालिका म्हंटलं जातं. शिवभक्त असल्याने ते नरमुंडी कायम सोबत ठेवतात. तसचं या नरमुंडीचा वापर ते भोजनपात्र म्हणूनही करतात.

अगदी रहस्यमय जीवन जगणारे अघोरी बाब सहजा तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. महाशिवरात्री आणि कुंभमेळासारख्या धार्मिक कार्यावेळी ते एकत्र येतात. पुर्नजन्माच्या चक्रातून मोक्ष प्रात्प व्हावा यासाठी ते गुंफांमध्ये कायम तपस्या करत असतात.

अघोरी बाबा हे केवळ शिव म्हणजेच महादेव आणि काली माता म्हणजेच पार्वती मातेची पूजा करतात. इतर हिंदू देव देवतांची ते पूजा करत नाहीत. त्यांच्यासाठी शिव- पार्वती हेच सृष्टीचे निर्माते असून शिव हाच सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तीशाली आहे.

अघोरी बाबा हे केवळ शिव म्हणजेच महादेव आणि काली माता म्हणजेच पार्वती मातेची पूजा करतात. इतर हिंदू देव देवतांची ते पूजा करत नाहीत. त्यांच्यासाठी शिव- पार्वती हेच सृष्टीचे निर्माते असून शिव हाच सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तीशाली आहे.

टॅग्स :Hindu religionreligion