
Panchang 11 May : बाहेर पडताना दही खायला विसरू नका; जाणून घ्या आजचं पंचांग
आज दिनांक ११ मे २०२३. जाणून घ्या आजचे पंचांग. आज काय करावे, काय करू नये, याची संपूर्ण माहिती, महत्त्वाच्या कामासाठीचे मुहुर्त जाणून घ्या.
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २१ शके १९४५
महत्त्वाच्या वेळा
सूर्योदय -०६:०६
सूर्यास्त -१८:५५
चंद्रोदय - २४:४६
प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०६
सायं संध्या - १८:५५ ते २०:०३
अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२
प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०
निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३
राहु काळ - १४:०७ ते १५:४३
यमघंट काळ - ०६:०६ ते ०७:४३
श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
शुभ काळ
सर्व कामांसाठी दु.१२:५३ प.शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
लाभदायक-
लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७
अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४३
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर गुरु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४५
संवत्सर - शोभन
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - वैशाख
पक्ष - कृष्ण
तिथी - षष्ठी(१२:५३ प.नं. सप्तमी)
वार - गुरुवार
नक्षत्र - उत्तराषाढा(१५:५३ प.नं.श्रवण)
योग - शुभ(१६:२६ प.नं. शुक्ल)
करण - वणिज(१२:५३ प.नं.भद्रा)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - मेष
गुरु रास - मेष
काय करावे, काय करू नये?
या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.
दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.
‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
दत्तगुरुंना पेढ्याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हळद दान करावी.
दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
या दिवशी तेल खावू नये
या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.