
Shani Dev : बापरे! खुद्द शनिदेव घाबरतात या चार व्यक्तींना; जाणून घ्या भीतीचे कारण...
Shani Dev : शनिदेवांना कर्माचा दाता म्हणतात. ते माणसाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देतात, चांगल्या कर्मांचे शुभ फळ आणि वाईट कर्मांची शिक्षा. ज्या व्यक्तीवर शनिदेव कोपतात त्या व्यक्तीला साडे साती भोगावी लागते अन् यात व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळेच प्रत्येक व्यक्ती शनिदेवाला घाबरतो.
पण शनिदेवही कुणाला घाबरतात का? हो, ऐकून खरंतर आश्चर्य वाटेल पण शनिदेव सुद्धा काहींना घाबरतात. असं म्हणतात की हनुमानजींशिवाय अजूनही काही देवता आहेत ज्यांच्या समोर शनिदेव भीतीने थरथर कापतात. चला बघूया कोण आहेत या देवता आणि त्यांना घाबरण्याचे कारण काय आहे.
१. हनुमान :

Shani Dev
हनुमानजींनी लहानपणी एकदा शनिदेवाचा अहंकार मोडला होता, तेव्हापासून असे मानले जाते की शनिदेव हनुमानजींना खूप घाबरतात. असे मानले जाते की शनिदेव कोणत्याही हनुमान भक्ताचे कधीही नुकसान करत नाहीत. जो कोणी हनुमानजींची पूजा करतो, त्याच्यावर शनिदेवाची कृपा कायम राहते.
२. पिंपळाचे झाड :

Shani Dev
पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव पिंपळाच्या झाडाला खूप घाबरतात. या कारणास्तव असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव आपला राग कमी करतात.
३. श्रीकृष्ण :

Shani Dev
शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते अशा मान्यता आहेत आणि त्यामुळे भक्ताच्या प्रतिष्ठेनुसार, शनिदेव श्रीकृष्णांना घाबरतात. या कारणास्तव, त्यांच्या साडेसाती सातीचा प्रभाव कोणत्याही कृष्णाच्या खर्या आणि सद्गुणी भक्तावर पडत नाही.
४. शिवशंकर :

Shani Dev
भगवान शिव हे शनिदेवाचे गुरू मानले जातात, म्हणूनच गुरु-शिष्याच्या नात्यामुळे शनिदेव महादेवांना घाबरतात. जो व्यक्ती भगवान शिवाची मनापासून भक्ती करतो त्याच्यावर शनिदेव नेहमीच कृपा दाखवतात.