Magh Pournima 2023 : माघपौर्णिमा 'या' राशींसाठी ठरणार खास, होणार धनवर्षाव

माग महिन्यातल्या पौर्णिमेचं विशेष महत्व असतं. काही राशींसाठी धनलाभ करून देणारी ठरणार आहेत, जाणून घ्या
Magh Pournima 2023
Magh Pournima 2023esakal

Magh Pournima 2023 : प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही विशेष तिथी असते. त्याचं एक विशेष महत्व असतं. त्यात माघ महिन्यातली पौर्णिमा ही विशेष समजली जाते. कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी लक्ष्मी देवीची पुजा करण्याचं खास महत्व आहे. यावेळी माघ पौर्णिमेला खास संयोग जुळून आला आहे.

दुर्लभ योग

ज्योतिष शास्त्रानुसार या माघ पौर्णिमेला ४ दुर्लभ योग जुळून आले आहेत. एकाच दिवशी हे चार योग जुळून येणं हे फारच शुभ मानलं जातं. यंदा माघ पौर्णिमेला सौभाग्य, रवि पुष्य, आयुष्मान आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. या दिवशी लक्ष्मीची आणि चंद्राची पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळतं. शिवाय पैशासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस विशेष समजला जातो.

Magh Pournima 2023
Magh Pornima 2023 : माघ पोर्णिमेला जुळून येणार 4 शुभ योग; जाणून घ्या तिथी अन् मुहूर्त

या मुहूर्ताला करा स्नान

या दिवशी वांछित फल प्राप्तीसाठी शुभ मुहूर्तावर स्नानाचं विशेष महत्व आहे. हा मुहूर्त ५ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजून २७ मिनीटांपासून तर ६ वाजून १८ मिनीटांपर्यंत आहे.

याशिवाय दिवस भर लक्ष्मी देवीचा जप, पूजा, आराधना करणे लाभदायक ठरेल.

राशींना होणार फायदा

ग्रह नक्षत्रांची गती राशींवर आणि पर्यायाने जीवनावर प्रभाव पाडत असते. यावेळी जे ४ दुर्लभ योग बनत आहेत त्यामुळे वृषभ, कर्क, सिंह, तुळ आणि वृश्चिक या राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com