अंत्री मलकापूर येथील २०० वर्षे पुरातन स्वयंभू लिंग

आज महाशिवरात्री उत्सव; विविध कार्यक्रम
अंत्री मलकापूर येथील २०० वर्षे पुरातन स्वयंभू लिंग

अकोला : बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील स्वयंभू महादेव हे अती पुरातनं स्वयंभू व जागृत देवस्थान आहे. याचा प्रत्यय परिसरात पाय ठेवल्याबरोबर जाणवायला लागतो व दर्शनाने अंतःकरणात भक्तीचा संचार व्हायला लागतो. मुख्य शिवलीग आज ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीमध्ये मागील २०० वर्षांपासून होते.

गर्भगृहातील शिवलिंगामध्ये फक्त वरचा भाग शिव रुपाने दिसत होता. सन १९९६ ला जेव्हा गावकऱ्यांना भगवंताने प्रेरणा देवून जिर्णोध्दार करवून घेतला. त्यानंतर जवळजवळ वर्षभरात फक्त शिव (वरच्या भागाचे) लिंगाचेच पूजन गावकऱ्यांना घडत होते. एके दिवशी एका महात्म्याने पार्वतीविग्रह (खालचा भाग) नसल्यामुळे हे शव आहे, याला पार्वतीविग्रहाची स्थापना करून शिव करा असा सल्ला दिला.

भगवान शंभूच्या संपूर्ण दर्शनाची वेळ जवळ यायला लागली होती. ता. २४ नोव्हेंबर १९९७ ला काळ्या दगडामध्ये अकोल्यावरून आणलेल्या पार्वती विग्रहाच्या स्थापनेचा दिवस निश्चित करण्यात आला. हा विग्रह लावण्यासाठी गाभाऱ्यातील खोदकाम सुरू केल्यानंतर सद्या स्थितीत आहे तशी मुळ पुर्णलिंग दृष्टीक्षेपास यायला लागले व भगवान शंभूने पूर्ण रुपात याच दिवशी प्रथम दर्शन दिल्याची माहिती अंत्री मलकापूर येथील श्री महादेव संस्थान ट्रस्टचे अरविंद देठे यांनी दिली. त्यांच्या मार्फत या मंदिराचा जिर्णोद्दार करण्यात आला असून, एक पर्यंटण स्थळ म्हणून त्याचा विकास करीत आहेत. महाशिवरात्रीला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

चौकोनी शिवलिंग

अंत्री मलकापूर येथील शिवलींग चौकोणी असून, अशा प्रकारचे लिंग संपूर्ण भारतात जेथे-जेथे शिवाचे स्वयंभू, रूपात दर्शन होतात तेथेच आहे. जसे रामेश्वरम्, राजस्थानचे एकलिंगनाथ आदी ठिकाणच्या शिवलिंगाप्रमाणे येथील शिवलिंग आहे. या लिंगामध्ये पंचमूखी शिवांचे दर्शन होते व पिंडीच्या भागाचे निरीक्षण केले असता. ॐ चा आकार दृष्टीस येतो. आपल्या परिसरात स्वयंभू महादेव प्रगट होण्यामागे निश्चितपणे काहितरी दिव्य हेतू असावा, याची प्रचित मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com