
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक केल्याने पुर्ण होतील मनोकामना...
Rudrabhishek On Mahashivratri : आपल्या अनेक पुराण ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचे महत्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे व्रताचे स्वरुप आहे. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्व आहे. या दिवशी शंकरपार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढण्याची काही ठिकाणी पद्धत आहे.
हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत समाप्त होते. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक ही प्रभावी पूजा आहे असे मानले जाते. असं मानलं जातं की शिवालया रुद्राभिषेक केल्याने त्याचा प्रभाव लवकर जाणवतो. यामुळे सर्व मनोरथ पुर्ण होतात. हा अभिषेक महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना केल्यास त्याचा विशेष लाभ होतो.
मुहूर्त
महाशिवरात्री सायंकाळी ५.४३ वाजेपासून सुरु होत असून १९ फेब्रुवारीला दुपारी ३.२९ पर्यंत असणार आहे. यंदा महाशिवरात्रीला शनि, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. या तीन्ही ग्रहांनी मिळून त्रिग्रही योग तयार होतो. जो दुर्मिळ योग आहे.
अशी साजरी करा महाशिवरात्री
शिवभक्तांसाठी हा सण फार महत्वाचा आहे. उपवास, पूजा आणि जागरण ही या व्रताची तीन अंग आहेत. या उपवासाटत फक्त एकवेळच खावे. रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, याला शिवरात्री पूजा म्हटले जाते. प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. त्यावर बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका शिवपिंडीवर वाहव्यात, तांदळाच्या पिठीचे २६ दिवे करून ते ओवाळावे.