
Mahashivratri 2023 : यंदा महाशिवरात्रीला या 3 राशींवर असेल महादेवाची कृपा, मिळेल भाग्याची साथ...
हिंदू पंचागानुसार दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हिंदू धर्मात या दिवसाचं विशेष महत्व आहे. या दिवशी महादेवाची निर्स्वार्थ आराधना केली जाते आणि सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना केली जाते.
तसेच या दिवशी उपवासही केला जातो. या दिवसाचं विशेष म्हणजे या दिवशी महादेव आणि पार्वती यांची विवाह झाला होता.ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी दुर्लभ योग जुळून आले आहेत. त्याचा लाभ या काही राशींना होणार आहे. तुमच्या राशीत कुठला योग आहे जाणून घेऊया.
या दिवशी शनि प्रदोष व्रतसुद्धा आहे. तेव्हा तुमच्या राशीत या शुभ दिवशी कोणते योग जुळून आलेत ते जाणून घेऊया.
महाशिवरात्रीला या तीन राशींवर असणार महादेवाची कृपा
मेष राशी - ज्योतिश शास्त्रानुसार या राशीसाठी हा दिवस फार शुभ असणार आहे. या दिवशी तुम्हला भाग्याची साथ मिळेल. तसेच आर्थिक लाभ देखील होईल. कमावण्याच्या नव्या संधी पुढे येतील. (mahashivratri)
कर्क राशी - ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री सौभाग्य घेऊन येणार आहे. महादेवाच्या कृपेने या राशींना यशस्वीता मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.नोकरीत पदोन्नती होईल. लाभ आणि धनप्राप्ती होईल.
धनु राशी - धनु राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री फारच खास ठरणार आहे. तुमची प्रकृती सुधारेल. नोकरीच्या नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला धनलाभ होईल. सोबतच व्यापारातही प्रगती होईल. (horoscope)
डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.