Makar Sankranti 2023 : आली संक्रांत दारात... असं का म्हणतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 : मकर संक्रातीच्या दिवशी 'या' चुका करू नका, नाहीतर...

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत आपण हा सण साजरा करतो कारण संक्रांत म्हटलं की प्रत्येकाच्या मनात थोडीशी काम होईना भीती असते. एखादा नको असलेला माणूस दाराशी आला किंवा एखादा संकट आलं की म्हणतात आली संक्रांत दारात. असं म्हणण्याचं कारण काय हे आपण जाणून घेऊया.

तशी संक्रांत दर महिन्याला येत असते. कारण सूर्य हा दर महिन्याला एका राशीतून दुसरा राशीत संक्रमण करतच असतो परंतु जानेवारी महिन्यात उत्तरायण सुरू होते. या महिन्यात सूर्य धनु राशीतून मकर राशि मध्ये प्रवेश करतो म्हणजेच अग्नितत्त्वातून पृथ्वीतत्वा मध्ये प्रवेश करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करणे यालाच संक्रमण (संक्रांत) असे म्हणतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताना त्या राशीचे थोडेसे गुणदोष सूर्य पुढच्या राशीमध्ये घेऊन येतो आणि मुळातच मकर ही शनीची रास.

हेही वाचा: Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो?

रवी आणि शनि हे पिता-पुत्र जरी असले तरी एकमेकांचे शत्रू आहेत. सूर्य स्वाभिमानी अहंकारी तापट उष्ण असा आहे तर शनि नम्र मंदगती थंड डोक्याचा असा आहे. दिवसा सूर्याचं राज्य तर रात्री शनि महाराजांचे राज्य. आपण बघतो जेव्हा सूर्य दिवसा असतो तेव्हा आपण उष्णता अनुभवू शकतो परंतु जशी संध्याकाळ सुरू होते रात्र होते तेव्हा थंडी जास्त जाणवायला लागते. तर अशा शनि महाराजांच्या मकर राशित सूर्याचा प्रवेश होतो आणि थंडी हळूहळू म्हणजेच तिळात तिळाने कमी होत जाते.

हेही वाचा: Makar Sankranti 2023 : तिळगुळाचा लाडू फुटता फुटत नाही? असा बनवा परफेक्ट लाडू

संक्रांत ही जेव्हा येते त्या दिवशी स्त्रिया काळे कपडे परिधान करतात नववधू जरी असली तरी ती काळे कपडे परिधान करते या मागील शास्त्र आपण बघूयात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो बाहेर थंडी असल्यामुळे सूर्याची उष्णता काळा रंग शोषून आपल्याला उब देतो‌. तिळगुळ देण्याचे शास्त्रीय आपण बघूया तीळ उष्ण असतो त्यामुळे शरीराला उबदार राखण्यासाठी तिळगुळ सेवन केले जाते. म्हणून " तिळगुळ घ्या आणि गोड बोला".

हेही वाचा: Makar Sankranti 2023: तीळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 

यावेळेस 14 जानेवारी 2023 रोजी रात्री आठ वाजून 44 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी याचा अर्थ भोग भोगणे. जसा मातेच्या गर्भातून येताना बालकास त्रास होतो म्हणजेच भोग भोगायला लागतात तसाच सूर्याला धनु राशीतून मकर राशि प्रवेश करताना जो त्रास होतो किंवा जे भोग भोगायला लागतात त्याला भोगी असे म्हणतात.

हेही वाचा: Makar Sankranti : तिळ मूळचा भारतीय आहे का? असा आहे तिळाचा इतिहास

संक्रांत 15 जानेवारीला २०२३ ला रविवारी येत आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पर्वकाला आहे. यावेळेस संक्राती चे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे ती पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे तिच्या हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा आहे वयानी कुमार आहे आणि बसलेली आहे वासाकरिता जाई चे फुल तिने हातात घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची असून भूषणार्थी मोती धारण केलेला आहे.

तिचे वार नाव राक्षसी व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे ती दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. याचा अर्थ तिने जय जय परिधान केले आहे त्या सर्व गोष्टी महाग होणार आहेत. ती ज्या दिशेकडून येत आहे तिथे सुकाळ असणार आणि ज्या दिशेकडे जात आहे त्या दिशेला त्रास असणार.

संक्रांतीच्या काळात काय करू नये : या काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे का व काम विषय सेवन हे करू नये.

या दिवशी काय करावे : तीन मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे अंगस लावणे तिल होम तिल तर्पण तीलभक्षण व तिल दान या गोष्टी कराव्यात. याचबरोबर स्त्रियांनी गाईला घास घालने, तीळ गुळ अन्न नवीन भांडे सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथा शक्ती दान करावे.

टॅग्स :Makar Sankranti Festival