Neem Karoli Baba : नीम करोली बाबांचे हे तीन सिद्धांत आयुष्यात उतरवा अन् धनवान व्हा...

नीम करोली बाबांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे आयुष्यातले दुःख दूर होऊन सुखाचा अनुभव येईल.
Neem Karoli Baba
Neem Karoli Babaesakal

Neem Karoli Baba Upay : विसाव्या शतकातल्या महान संतांमध्ये नीम करोली बाबांचं नाव आहे. देशात परदेशात बाबा जगप्रसिद्ध आहेत. बाबा स्वतः हनुमंताचे भक्त होते. त्यांचे भक्त त्यांना हनुमंताचा अवतार मानतात. त्यांच्या चमत्कारांशी निगडीत अनेक रहस्य आहे. सुखी आयुष्य जगण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी नीम करोली बाबांनी काही महत्वपूर्ण सिद्धांत सांगितले आहेत. ज्याच्या अनुकरणाने तुम्हीही आर्थिक चणचणीतून मुक्ती मिळवू शकतात.

प्रत्येकच व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असतं किंवा पैसे कमवायचे असतात. पण श्रीमंत होण्याचे काही सिद्धांत बाबा सांगतात. जाणून घेऊया.

पैशांचा वापर

एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे म्हणून तो धनवान होत नाही तर ज्याला आपल्याकडे असलेल्या धनाचा योग्य वापर कसा करायचा हे माहित आहे त्याला धनवान म्हणावे. बाबांच्या म्हणण्यानुसार अशा धनवानचा काही उपयोग नाही जो दुसऱ्या गरजूला मदत करत नाही. त्यामुळे खरा धनवान तोच असतो ज्याला याचं महत्व आणि योग्य वापर माहित असतो.

Neem Karoli Baba
Neem Karoli Baba : नीम करोली बाबा म्हणतात, 'हे' संकेत मिळाले तर समजा येणार 'अच्छे दिन...'

धनाचा विनियोग

नीम करोली बाबांच्या मते जोवर तुम्ही एखाद्या गोष्टीला रिकामे करत नाही तोवर ते भरणार कसे? त्याचप्रमाणे जर धनाचा योग विनियोग न करता फक्त जमा करून ठेवलं तर ते वाढत नाही. कोण्या गरजूसाठी पैसा खर्च केला तर परमेश्वराची कृपा बरसते आणि अशा लोकांकडे पैशाची आवक कायम सुरू राहते.

Neem Karoli Baba
Mole Astro Tips : महिलांच्या शरीरावर इथे तीळ असणं ठरतं लकी..!

स्वतःला कधी गरीब समजू नका

बाबा म्हणतात धनवान तोच आहे जो कधी स्वतःला गरीब समजत नाही. खरा धनवान तोच आहे जो चारित्र्य, व्यवहार आणि परमेश्वरावरील आस्थेने पुरेपूर भरलेला असतो. हिच खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील जमापूंजी आहे. हा असा किमती खजाना आहे जो दिसत नसला तरी कायम भरलेला राहतो. त्यामुळे खरा धनवान तोच आहे जो कर्म, भाव, भक्ती आणि कल्याणाने भरलेला आहे. जर तुमच्यात हे गुण आहेत तर स्वतःला कधी गरीब समजू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com