Neem Karoli Baba : विराट कोहलीच्या गुरुंचे 'हे' उपाय करा, कधीच जाणवणार नाही पैशांची कमी l Neem Karoli Baba money wealth tips ritch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neem Karoli Baba

Neem Karoli Baba : विराट कोहलीच्या गुरुंचे 'हे' उपाय करा, कधीच जाणवणार नाही पैशांची कमी

Neem Karoli Baba : नीम करौली बाबा २० व्या शतकातले अग्रणी संतांपैकी एक होते. त्यांच्या भक्तांच्या लीस्टमध्ये जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे आहेत. जे आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत होते. यात स्टीव जॉब्ज, मार्क जुकरबर्ग, जुलिया रॉबर्ट यांचाही समावेश होता. बाबा नीम करौली गावात नैनीतालच्या कैंची धाम इथे राहत होते. म्हणूनच त्यांना नीम करौली बाबा नावाने ओळखलं जाऊ लागलं.

त्यांनी आपल्या आयुष्यात १०८ पेक्षा जास्त हनुमान मंदिरांचं निर्माण केलं होतं. ते हनुमानाचे परम भक्त होते. त्यांचे अनियायी त्यांना महाराजजी म्हणून संबोधीत करायचे. त्यांचं खरं नाव लक्ष्मण नारायण शर्मा होतं. त्यांचा जन्म १९०० मध्ये उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातल्या अकबरपुर गावात झाला होता. ते एका श्रीमंत ब्राह्मण परिवारात जन्माला आले.

नीम करौली बाबा भक्ती याोगाचे अभ्यासक होते. आणि त्यांचं माननं होतं की, दुसऱ्यांची सेवा करणं हे ईश्वराच्या प्रती व्यक्त केलेली सर्वोत्तम अभिव्यक्ती आहे. त्यांनी लोकांना अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकाल. यात बाबांनी सांगितलेल्या अशा तीन गोष्टी जाणून घेऊ ज्यामुळे तुम्हीही श्रीमंत होऊ शकाल.

आवश्यक कामांसाठी पैसे वापरा

आजच्या काळात ज्यांच्याकडे भरपूर पैसा असूनही जर ते गरजूंची मदत करत नसतील तर ते श्रीमंत नाही. नीम करौली बाबा म्हणतात, श्रीमंत तोच आहे जो पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करतो. त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुमच्या पैशांचा योग्य वापर करायला शिका.

देव अशाच लोकांना श्रीमंत बनवतो

बाबा म्हणतात की, देव अशाच लोकांना श्रीमंत बनवतो ज्यांनी गरजू गरीबांनी या धनातून मदत करणं अपेक्षित असतं. ज्यांच्या मनात गरीबांविषयी सहानुभूती नाही देव त्यांना श्रीमंत बनवत नाही.

आहे त्यात समाधान मानायला शिका

बाबा म्हणतात माणसाने आहे त्यात समाधानी रहायला शिकायला हवं. आपल्याकडच्या संपत्तीला कमी लेखू नये. देवाने ज्याला जे दिलं आहे ते त्याच्यासाठी योग्य आहे म्हणूनच.

टॅग्स :money