Sun, June 4, 2023

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 फेब्रुवारी 2023
Published on : 11 February 2023, 1:20 am
पंचांग
शनिवार : माघ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री ११.१३, चंद्रास्त सकाळी १०.२६, भारतीय सौर माघ २२ शके १९४४.
दिनविशेष
२००० : पृथ्वीचा सुधारित नकाशा तयार करण्यासाठी ‘एन्डेव्हर’ या अवकाश यानाचे केप कॅनव्हेराल येथून उड्डाण. या अवकाशयानातून मिनिटाला एक लाख चौरस किलोमीटर या वेगाने छायाचित्रे काढली जातात.
२०१७ : भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्रभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीच्या यशामुळे भारताने द्विस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकले.