आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 सप्टेंबर 2022

पंचांग

सोमवार : भाद्रपद कृष्ण २, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री ८.१२, चंद्रास्त सकाळी ७.५९, तृतीया श्राद्ध, डोरली व्रत, भारतीय सौर भाद्रपद २१ शके १९४४.

दिनविशेष

२००२ : ‘मेटसॅट’ या भारताच्या हवामानविषयक पहिल्या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण.

२००८ : प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर स्वीडनचा नेमबाज योनास जेकबसनने पॅरालिंपिकमध्ये सोळावे सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला.

२०१० : सुशीलकुमारने रशियात सुरू असलेल्या जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारातील ६६ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले.

२०१५ : स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत भारताच्या लिअँडर पेसने इतिहास घडविला.

२०१६ : भारताच्या दीपा मलिकने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत गोळाफेकीच्या एफ ५३ प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 12 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchangHistory