आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मे 2023 on this day happened today panchang history in marathi 20th May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 20th may 2023

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मे 2023

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३५, चंद्रास्त सायंकाळी ७.५२, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, गंगादशहरारंभ, करिदिन, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - देशी बनावटीच्या ‘पिनाक’ या अत्याधुनिक रॉकेट यंत्रणेची, वाढीव पल्ल्याची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २००० - जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची कोचीन येथे यशस्वी चाचणी.

  • २००१ - अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, वितरक ना. य. तथा अण्णासाहेब देऊळगावकर यांना जाहीर.