
पंचांग - शनिवार : पौष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा/उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सकाळी ७.३८, चंद्रास्त सायंकाळी ५.५१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ६.१८, समाप्ती उ. रात्री २.२३, मौनी अमावास्या - जैन, भारतीय सौर माघ १ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 जानेवारी 2023
पंचांग -
शनिवार : पौष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा/उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सकाळी ७.३८, चंद्रास्त सायंकाळी ५.५१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ६.१८, समाप्ती उ. रात्री २.२३, मौनी अमावास्या - जैन, भारतीय सौर माघ १ शके १९४४.
दिनविशेष -
१९९९ - जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट अँड एक्झिबिशन’ने १९९१च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक व संगीतकार पं. रवी शंकर यांची निवड केली.
२००० - ‘फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
२००४ - पॅराशूट रेजिमेंटच्या नवव्या बटालियनचे जवान संजोग छेत्री यांना मरणोत्तर ‘अशोकचक्र’ सन्मान जाहीर.
२००८ - ‘पोलर सॅटेलाइट लॉँच व्हेइकल’ (पीएसएलव्ही) या अंतराळ वाहकाच्या साह्याने भारताने इस्राईलच्या ‘पोलोरिज’ या उपग्रहाला यशस्वीरीत्या अंतराळात सोडले.