आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑक्टोबर 2022

पंचांग

रविवार : आश्‍विन कृष्ण १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय पहाटे ५.१७, चंद्रास्त दुपारी ४.५३, शिवरात्री, उल्कादर्शन, दीपदान, वृश्‍चिकायन, भारतीय सौर कार्तिक १ शके १९४४.

दिनविशेष

१९९९ : ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘कबीर’ पुरस्कार जाहीर.

२०१२ : भारतीय वंशाची अमेरिकन अवकाशवीरांगना सुनीता विल्यम्सने अवकाशात शंभर दिवस पूर्ण केले.

२०१३ : क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’ने सार्वकालिक जागतिक कसोटी संघाची घोषणा करून त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश केला.

२०१५ : जर्मनीची जुनी राजधानी असलेल्या बॉन शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांचा शपथविधी.