Tue, June 6, 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 फेब्रुवारी 2023
Published on : 25 February 2023, 1:13 am
पंचांग
शनिवार : फाल्गुन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.२८, चंद्रास्त रात्री ११.४१, भारतीय सौर फाल्गुन ६ शके १९४४.
दिनविशेष
१९९६ ः स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे नाव त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वर्गदारा’तील ताऱ्याला दिले. मिथुन तारकासमूहातील पुनर्वसू (कॅस्टर) व पोलक्सजवळच्या या स्वर्गदारातील ताऱ्याचे नामकरण ‘कुसुमाग्रज तारा’ असे झाले.
१९९९ ः संगीत क्षेत्रात सर्वांत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार एकाच वेळी जिंकून लॉरिन हिल यांनी विक्रम केला. ‘टायटॅनिक’या चित्रपटातील ‘माय हार्ट विल गो ऑन’ या गाण्याला चार पुरस्कार मिळाले.