आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 डिसेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 डिसेंबर 2022

पंचांग

सोमवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.५५, चंद्रास्त रात्री ९.२४, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष ५ शके १९४४.

दिनविशेष

२००३ ः अवकाश प्रणोदक तंत्रज्ञानातील (स्पेस प्रॉपेलेंट टेक्‍नॉलॉजी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘सतीश धवन विशेष प्राध्यापक’ हे पद जाहीर करून सन्मान केला.

२००४ ः इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ झालेला भूकंप आणि त्यामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा भारताची दक्षिण किनारपट्टी व श्रीलंकेसह हिंदी महासागरातील मोठ्या टापूत बसलेला फटका यांमुळे साडेआठ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. सुमात्रा बेटांत केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्‍टर होती. त्यामुळे प्रचंड लाटा उसळून हाहाकार उडाला.

२००७ ः ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार यांना ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

२०१५ ः विमाक्षेत्रात परकी गुंतवणूक आणि कोळसा खाणवाटपात पारदर्शीपणा येण्यासाठी ई-लिलाव करण्यासंदर्भातील अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.