आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today Panchang

पंचांग - रविवार : आषाढ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ९.२४, चंद्रास्त रात्री १०.३३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आषाढ १२ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जुलै 2022

पंचांग -

रविवार : आषाढ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ९.२४, चंद्रास्त रात्री १०.३३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आषाढ १२ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - ‘ए मेरे वतन के लोगों....’ हे ऐतिहासिक गीत ज्यांच्या लेखणीतून उतरले ते कवी प्रदीप यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर. कवी प्रदीप यांचे मूळ नाव रामचंद्र नारायणजी द्विवेदी.

  • २००० - ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रूपांतराच्या प्रस्तावाला राज्य सरकार, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींची मान्यता.

  • २००१ - ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  • २००२ - ‘इन्सॅट-३ सी’ हा सर्वांत मोठा स्वदेशी उपग्रह देशाला अर्पण.

  • २००४ - रशियाच्या मारिया शारापोवाने विंबल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकणारी शारापोवा ही पहिलीच रशियन खेळाडू ठरली.